मुंबई, 2 एप्रिल : 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात आयपीएल 2022 मधील 9 वी मॅच होणार आहे. या मॅचमध्ये मुंबईची नजर पहिल्या विजयावर आहे. तर राजस्थानचा प्रयत्न विजयी अभियान कायम ठेवण्यावर असेल. मुंबईच्या टीममध्ये सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) पुनरागमन झालं आहे. त्याच्या समावेशानं टीम भक्कम होणार असून त्यामध्ये बदल नक्की आहे. तर राजस्थानचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईल जखमी आहे. तो फिट नसल्यास टीममध्ये बदल होऊ शकतो. मुंबईच्या टीममध्ये सूर्यकुमार यादवचा अनमोलप्रीत सिंहच्या जागी समावेश होऊ शकतो. त्याचबरोबर डॅनियल सॅम्सला बाहेर बसावं लागू शकतं. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या मॅचमध्ये सॅम्सनं 4 ओव्हर्समध्ये 57 रन दिले होते आणि एकही विकेट घेतली नव्हती. राजस्थाननं मागच्या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये दमदार कामगिरी केली होती. कॅप्टन संजू सॅमसन, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल चांगल्या फॉर्मात आहेत. तर बॉलिंगमध्ये ट्रेन्ट बोल्ट, युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन अशी अनुभवी फौज राजस्थानकडे आहे. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. राजस्थाननं फिल्डिंग खराब केली होती. ती त्यांना सुधारावी लागेल कारण, मुंबई विरूद्ध त्यांना यामधील एक चूकही महाग पडू शकते. राजस्थानचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईल जखमी आहे. त्याच्या जागेवर जिमी निशामला संधी मिळू शकते. IPL 2022, MI vs RR Dream11 Prediction: ‘हे’ 11 खेळाडू तुम्हाला करू शकतात मालामाल मुंबई इंडियन्सची संभाव्य Playing 11 : रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स/फॅबियन अॅलन, मुरगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह आणि बसील थम्पी राजस्थान रॉयल्सची संभाव्य Playing 11 : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, नॅथन कुल्टर नाईल/जिमी नीशाम, आर. अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.