केरळ, 23 नोव्हेंबर: सध्या जगभरात फुटबॉल वर्ल्ड कपची क्रेझ आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या या फिफा वर्ल्ड कपमध्ये भारत सहभागी झाला नसला तरी भारतातही फुटबॉलचे अनेक चाहते आहेत. भारतात गोवा, पश्चिम बंगाल आणि केरळ ही फुटबॉलप्रेमी राज्य मानली जातात. केरळमध्ये तर सध्या फिफा वर्ल्ड कपचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पण याच उत्साहाला गालबोट लावणारी एक घटना नुकतीच केरळमध्ये घडली आहे. केरळच्या कोल्लममध्ये हाणामारी मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी केरळच्या कोल्लममध्ये फिफा वर्ल्ड कपच्या उद्घाटनादिवशी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातल्या फुटबॉल प्रेमींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळ्या समर्थकांनी मिळून ओपनिंग सेरेमनी आणि पहिली मॅच पाहायचा प्लॅन होता. पण याच कार्यक्रमाआधी अर्जेन्टिना आणि ब्राझील टीमच्या समर्थकांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन जुंपली. क्षुल्लक वादाचं हाणामारीत रुपांतर झालं. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.
A fight between fans of Brazil and Argentina in Kerala! Begaane ke shaadi me...! 🤦🤦🤦 #QatarWorldCup2022 #Brazil #Argentina #Kerala pic.twitter.com/0mUnxO2ajs
— Ananth Rupanagudi (@Ananth_IRAS) November 22, 2022
हेही वाचा - FIFA WC 2022: जोश आणि जल्लोष… सौदीत साजरी झाली दिवाळी, किंग सलमाननं केली ‘ही’ मोठी घोषणा
चाहत्यांवर पोलिसांची कारवाई दरम्यान या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांकडूनही लाठीचार्ज करण्यात आला. इतकच नाही तर 22 जणांना अटकही करण्यात आली.