मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

इंग्लंडच्या विजयाचे क्रिकेट टीमकडून दारू पिऊन सेलिब्रेशन, पाहा VIDEO

इंग्लंडच्या विजयाचे क्रिकेट टीमकडून दारू पिऊन सेलिब्रेशन, पाहा VIDEO

इंग्लंडनं युरोपीयन फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये (Euro Cup 2020) जर्मनीचा 2-0 असा पराभव केला. इंग्लंडच्या क्रिकेट टीमनं या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं.

  • Published by:  News18 Desk

लंडन, 30 जून: रहीम स्टर्लिंग (Raheem Sterling) आणि कॅप्टन हॅरी केन (Harry Kane) यांनी दुसऱ्या हाफमध्ये केलेल्या गोलमुळे इंग्लंडनं युरोपीयन फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये (Euro Cup 2020) जर्मनीचा 2-0 असा पराभव केला. या विजयाबरोबरच इंग्लंडने युरो कपच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या मॅचमध्ये स्टर्लिंगनं 75 व्या तर केननं 86 व्या मिनिटाला गोल केला. इंग्लंडच्या कॅप्टनचा या स्पर्धेतील पहिलाच गोल आहे. फुटबॉल टीमनं मिळवलेल्या विजयाचं इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनीही जोरदार सेलिब्रेशन केले.

श्रीलंका विरुद्ध (England vs Sri Lanka) यांच्यात मंगळवारी झालेल्या वन-डेमध्ये इंग्लंडनं 5 विकेट्सनं विजय मिळवला. क्रिकेट मॅच संपल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट टीमनं ड्रेसिंग रुममध्ये एकत्र बसून फुटबॉल मॅच पाहिली. इंग्लंड विजयी होताच त्यांनी बियर पिऊन सेलिब्रेशन केले.

इंग्लंडच्या फुटबॉल टीमचे कोच साऊथगेट यांच्यासाठी हा विजय खूप भावुक होता. 1996 साली जुन्या वेम्बली स्टेडियमवर साऊथगेट पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरले होते. त्यांच्या चुकीमुळे इंग्लंडची युरो 1996 च्या फायनलमध्ये जाण्याची संधी हुकली. त्या मॅचमध्ये गोल किपर असलेले डेव्हिड सिमन देखील मंगळवारी प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते.

पाकिस्तानच्या कोचनं पद सोडल्यानंतर प्रथमच सोडलं मौन, टीममधील वादावर केला खुलासा

वेम्बली स्टेडियममध्ये झालेल्या या मॅचमध्ये प्रिन्स विल्यम, त्याची पत्नी केंट  त्यांचा सात वर्षाचा मुलगा जॉर्ज उपस्थित होते. इंग्लंडच्या फुटबॉल टीमचा माजी कॅप्टन डेव्हिड बॅकहम तसेच टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनीही या मॅचचा स्टेडियममध्ये उपस्थित राहून आनंद घेतला. इंग्लंडची क्वार्टर फायनलमध्ये लढत युक्रेन विरुद्ध होणार आहे.

First published:

Tags: Celebration, England, Football, Rishabh pant, Sports, Victory