मुंबई, 30 जून: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू युनूस खानने (Younis Khan Resignation) काही दिवसांपूर्वीच बॅटींग कोचपदाचा राजीनामा दिला होता. टीम इंग्लंड दौऱ्यावर जाण्याच्या दोन दिवस आधीच युनूसनं राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली होती. फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) बरोबर झालेल्या वादामुळे युनूसनं पद सोडल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला होता. राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच युनूसनं या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. युनूसनं केली शिवीगाळ पाकिस्तानची क्रिकेट टीम काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली होती. त्या दौऱ्यात घडलेल्या प्रसंगामुळे युनूस खाननं राजीनामा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पत्रकार साज सादीक यांनी केला आहे. सेंच्युरीयनमध्ये झालेल्या टी20 दरम्यान युनूस खानचा फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) सोबत वाद झाला. साज सादीक यांच्या दाव्यानुसार, “सेंच्युरीनमधील मॅचच्या दरम्यान युनूस खान टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. त्याने हसन अलीला आईस बाथ (Ice Bath) घेण्यास सांगितले. युनूसचा हा सल्ला हसन अलीने फेटाळला. त्यावेळी त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. संतापलेल्या युनूसनं यावेळी हसन अलीला, ‘तुझा बाप देखील आईस बाथ घेईल’ या शब्दात शिवीगाळ केली. दोघांचे हे भांडण चांगलेच वाढले. त्यावेळी अन्य सदस्यांना मध्यस्थी करुन हे भांडण सोडवावे लागले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात घडलेल्या या प्रसंगानंतर युनूस खान नाराज झाला. तो त्यानंतर अन्य खेळाडूंमध्ये मिसळत नव्हता, याच नाराजीतून त्यानं राजीनामा दिला, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या रिपोर्टवर युनूसनं मौन सोडलं आहे. ‘या’ खेळाडूंच्या त्रासाला कंटाळून बांगलादेशचा अंपायर सोडणार पद काय दिले स्पष्टीकरण ? युनूसनं ‘जंग’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्याने हसन अलीसोबत झालेल्या वादामुळे पद सोडलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “या प्रकरणाला जास्त रंगवून सांगण्यात आले आहे. मला ट्रेनर यासिर मालिकनं हसन अलीशी बोलण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर मी त्याला समजावण्यासाठी गेलो होतो. आईस बाथ घेण्याच्या मुद्यावरुन आमच्यात वाद झावा. मी या वादाबद्दल नंतर हसनची माफी मागितली आणि हे प्रकरण तिथेच संपलं.” असा दाव युनूसने केला आहे. काही जणांनी विश्वासघात केला माझ्या राजीनाम्याचं कारण वेगळं आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (PCB) झालेल्या करारानुसार मला आणखी सहा महिने या विषयावर बोलता येणार नाही. पाकिस्तान क्रिकेट आणि पीसीबीचे हिताचा विचार करत मी या प्रकरणावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पीसीबीतील काही मंडळींनी अंतर्गत गोष्टी जाहीर करुन माझा विश्वासघात केला, तसंच माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असा दावा युनूसनं केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.