मुंबई, 25 नोव्हेंबर: जगातला सध्याच्या घडीचा सर्वात लोकप्रिय खेळाडू कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो. रोनाल्डोनं सध्या सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच सामन्यात इतिहास घडवला. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा रोनाल्डोच्या नावाची चर्चा रंगतेय. सोशल मीडियात रोनाल्डो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याच्या फॉलोअर्सची जगातल्या कोणत्याही सेलिब्रेटिपेक्षा जास्त आहे. पण रोनाल्डो इतका लोकप्रिय का आहे? तो त्याचं वैयक्तिक आयुष्य कसं जगतो? इतर खेळाडूंपेक्षा तो इतका फिट कसा? असे अनेक प्रश्न चाहत्यांसमोर आहेत. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी रोनाल्डोनं वैयक्तिक आयुष्यात काही नियम घालून घेतले आहेत. आणि याच नियमांमुळे तो आज यशस्वी ठरलाय. दारुपासून दूर ख्रिस्तियानो रोनाल्डो मद्यपान करत नाही. इतकच नव्हे तर मद्य आणि सॉफ्ट ड्रिंकसारख्या उत्पादनांची तो जाहिरातही करत नाही. रोनाल्डोच्या वडिलांचा दारुच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. रोनाल्डो दारुपासून दूर राहण्याचं हेही एक महत्वाचं कारण आहे.
नो सिगरेट रोनाल्डो धूम्रपानही करत नाही. दारु-स्मोकिंगसारख्या सवयींमुळे आपल्या खेळावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी रोनाल्डोनं स्वत:वर ही बंधनं घालून घेतली होती. शरीरावर एकही टॅटू नाही आजकाल अनेक खेळाडू आपल्या शरीरावर टॅटू गोंदवताना पाहायला मिळतात. पण रोनाल्डोच्या शरीरावर एकही टॅटू नाही. याचं कारण तो नेहमी रक्तदान करतो.
मेन्टेन बॉडी रोनाल्डो स्वत:चं शरीर फिट ठेवण्यावर खास मेहनत घेतो. तो सडपातळ दिसण्यामागचं तेच कारण आहे. रोनाल्डोच्या शरीरात केवळ 10 टक्के फॅट्स आहेत. याबाबतीत तो एखाद्या सुडौल मॉडेललाही मागे टाकतो. हेही वाचा - Ind vs NZ ODI: याला म्हणतात नशीब… एकाच मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ बॅट्समनला मिळाले 3 चान्स! ठोकली फिफ्टी फॅमिली लाईफ रोनाल्डोनं लग्न केलेलं नाही. पण त्याला पाच मुलं आहेत. आणि या सर्वांची तो चांगली काळजी घेतो. तो जेव्हा खेळत नसतो तेव्हा तो जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासह घालवतो. रोनाल्डो सध्या अर्जेन्टाईन मॉडेल जॉर्जिया रॉड्रिग्ससोबत रिलेशनशीपमध्ये आहे.