जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Mushtaq Ali T20: सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरनं केला गोव्याकडून डेब्यू, पहिल्याच सामन्यात पाहा अर्जुनची कामगिरी

Mushtaq Ali T20: सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकरनं केला गोव्याकडून डेब्यू, पहिल्याच सामन्यात पाहा अर्जुनची कामगिरी

अर्जुन तेंडुलकरचं गोव्याकडून पदार्पण

अर्जुन तेंडुलकरचं गोव्याकडून पदार्पण

Mushtaq Ali T20: दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच अर्जुननं मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्याला जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर त्यानं गोव्याकडून ट्रायल दिली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जयपूर, 11 ऑक्टोबर: आजपासून बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुननं आज गोव्याकडून टी20 पदार्पण केलं. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर गोवा आणि त्रिपुरा यांच्यात ब गटातला पहिला सामना पार पडला. या सामन्यात गोव्यानं त्रिपुराचा 5 विकेट्सनी पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरनं गोव्याकडून पहिलाच सामना खेळताना तीन ओव्हर्स टाकल्या. अर्जुनसह मुंबईचा माजी कर्णधार आणि मधल्या फळीतला फलंदाज सिद्धेश लाडनंही गोव्याकडून पदार्पणाचा सामना खेळला. अर्जुनची पदार्पणात कामगिरी अर्जुननं नव्या बॉलवर गोलंदाजी करताना 3 ओव्हरमध्य 6.66 च्या इकॉनॉमीनं 20 रन्स दिले. ज्यात एक फोर आणि सिक्स त्रिपुराच्या बॅट्समननी वसूल केले. पण अर्जुनला तीन ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नाही. या सामन्यात त्रिपुरानं 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 114 धावा केल्या. गोव्यानं 18.1 ओव्हरमध्येच 5 विकेट्स राखून  विजयी लक्ष्य गाठलं. गोव्याकडून विकेट किपर एकनाथ केरकरनं नाबाद 34 तर तनुष सावकारनं 36 धावा केल्या.

News18

सिद्धेश लाडही गोव्याकडे दरम्यान मुंबईचा आणखी एक धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार सिद्धेश लाडनंही आपला मोर्चा गोव्याकडे वळवला. सिद्धेशनंही या सामन्यात पदार्पण करताना दमदार कामगिरी बजावली. सिद्धेशनं 4 ओव्हर्समध्ये 15 रन्स देताना एक विकेट काढली. पण फलंदाजीत मात्र त्याला 7 धावाच करता आल्या. हेही वाचा -  Ind vs SA ODI: दिल्लीच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा, धवनच्या टीम इंडियानं केला ‘हा’ मोठा पराक्रम अर्जुननं दोन महिन्यांपूर्वीच सोडली मुंबई दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच अर्जुननं मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्याला जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर त्यानं गोव्याकडून ट्रायल दिली होती. आणि त्यानंतर अर्जुन गोव्याच्या टीममध्ये दाखल झाला.

News18

अर्जुनची कारकीर्द अर्जुननं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वयोगटातील स्पर्धांमधून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानं मुंबई अंडर-16, मुंबई अंडर-19 संघांचंही प्रतिनिधित्व केलं आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-19 कसोटी सामन्यांसाठी त्याची भारतीय युवा संघात निवड झाली होती. त्यानंतर तो मुंबईच्या टी20 संघातही दाखल झाला होता. पण सय्यद मुश्ताक अली करंडकात त्याला दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर रणजी करंडकाच्या साखळी सामन्यात मुंबई संघात निवड होऊनही त्याला अंतिम अकरात एकदाही संधी मिळाली नाही. पुढे रणजीच्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी त्याला संघातून वगळण्यात आलं. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलच्या गेल्या दोन मोसमात एकाही सामन्यात खेळण्याची संधी त्याला मिळालेली नाही. त्यामुळे अर्जुननं मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात