रावळपिंडी, 05 डिसेंबर : इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला. कसोटीच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या सत्रात पाकिस्तानला विजयासाठी 86 धावांची गरज होती. त्यांच्या 5 विकेट शिल्लक होत्या. पाकिस्तान विजयाच्या जवळ असल्याचं चित्र होतं. मात्र इंग्लंडचे वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांनी टिच्चून केलेल्या माऱ्याच्या जोरावर इंग्लंडने सामना 74 धावांनी जिंकला. या विजयासह मालिकेत त्यांनी 1-0 ने आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानने 88 व्या षटकात 9 गडी गमावले होते. अखेरची जोडी नसीम शाह आणि मोहम्मद अली मैदानावर होते. दोघेही 53 चेंडू खेळले. सामना अनिर्णित ठेवतील असं म्हटलं जात होतं. पण जॅक लीचने नसीम शाहला पायचित केलं. पाकिस्तानने यावर डीआरएस घेतला पण त्याचा फायदा त्यांना झाला नाही आणि इंग्लंडने सामना जिंकला.
पाकिस्तानला 800 पेक्षा जास्त धावा करून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या होत्या. तर दुसरा डाव ७ बाद २६४ धावांवर घोषित केला होता. पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या होत्या. त्यांच्या समोर ३४३ धावांचे आव्हान होते. जवळपास १२० षटकांचा खेळ असतानाही पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदाच पाकिस्तानला एखाद्या कसोटीत ८०० हून अधिक धावा केल्यानतंरही पराभवाला सामोरं जावं लागलंय. याआधी १९७२ मध्ये त्यांनी एका सामन्यात सर्वाधिक ७७४ धावा केल्या होत्या. तरी पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने तो सामना ९२ धावांनी जिंकला होता.
हेही वाचा : राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी होणार? BCCIच्या हालचाली सुरू
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ओलि रॉबिन्सनने टिच्चून मारा केला. टी ब्रेकनंतर रॉबिन्सनने आगा सलमानला पायचित केलं. याशिवाय अजहरअली झेलबाद झाला. तर जाहिद मोहम्मदसुद्धा झेलबाद झाला. याशिवाय जेम्स अँडरसनने हरिस रउफला पायचित केलं.
सामन्याच्या शेवटच्या सत्रात पाकिस्तानने 11 धावात पाच विकेट गमावल्या. संघाचा डाव 268 धावातच गुंडाळला. अँडरसन आणि रॉबिन्सनने प्रत्येकी ४ गडी बाद केले. तर लीच आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
हेही वाचा : टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अंडर १९ संघाचे नेतृत्व शेफाली वर्माकडे
कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने 657 धावा केल्या होत्या. यात जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, हॅरी ब्रूक यांनी शतके केली होती. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने 579 धावा केल्या होत्या. यात पाकिस्तानच्याही 3 फलंदाजांनी शतके केली. तर इंग्लंडने त्यांचा दुसरा डाव 7 बाद 264 धावांवर घोषित केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.