मुंबई, 09 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायलनमध्ये आज क्रोएशिया आणि ब्राझील यांच्यात आज रात्री साडे आठ वाजता लढत होणार आहे. पाच वेळा वर्ल्ड कप जिंकलेला ब्राझीलचा संघ आजचा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये गाठण्याच्या प्रयत्नात असेल. तर अर्जेंटीना आणि नेदरलँड यांच्यात मध्यरात्री साडेबारा वाजता सामना होणार आहे. यात अर्जेंटीनाचा स्टार फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीवर सर्वांची नजर असणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मैदानात उतरेल.
ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांनी गुरुवारी म्हटलं की, "डान्स करणं हे ब्राझीलच्या संस्कृतीचा भाग आहे. प्रतिस्पर्ध्यांचा अपमान करण्याचा उद्देश नाही. आमच्याकडे हेच होतं." ब्राझीलच्या खेळाडुंनी स्पर्धा सुरू होण्याआधीच म्हटलं होतं की, आधीपासूनच गोल केल्यानतंर सेलिब्रेशनसाठी काही डान्स स्टेप्स ठरवल्या आहेत. आता त्यांना लुका मोदरिचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या क्रोएशियाविरुद्ध विजय मिळवावा लागले. चार वर्षांपूर्वी क्रोएशियाला अंतिम सामन्यात फ्रान्सकडून पराभूत व्हावं लागलं होतं. आता ते पु्न्हा वर्ल्ड कप जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा : बांगलादेशविरुद्ध अखेरच्या वनडेआधी टीम इंडियात अचानक बदल, संघात फिरकीपटूचा समावेश
ब्राझीलप्रमाणे क्रोएशियाने वर्ल्ड कपमध्ये दोन वेळाच गोल गमावले आहेत. संघाने कॅनडाला ४-१ ने हरवलं, त्यानंतर मोरक्को आणि बेल्जियमसोबत ड्रॉ राहिला. तर राऊंड १६ मध्ये क्रोएशियाने जपानविरुद्ध अतिरिक्त वेळेत १-१ असा बरोबरीत सामना राहिल्यानतंर पेनल्टी शूटआऊटवर विजय मिळवला. वर्ल्ड कपमध्ये क्रोएशिया गेल्या पाचपैकी चार सामन्यात अतिरिक्त वेळेत गेले आहे. तर गेल्या ९ नॉकआऊट सामन्यापैकी सातमध्ये यशस्वी राहिली आहे.
ब्राझीलचा संघ सलग आठव्यांदा आणि एकूण १४ व्या वेळेस वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये खेळत आहे. गेल्या चार क्वार्टर फायनलमध्ये तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१४ मध्ये सेमीफायनलमध्ये त्यांना जर्मनीकडून १-७ अशा गोल फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं.
हेही वाचा : वर्ष 2022 टीम इंडियासाठी ठरलं अनलकी, जिव्हारी लागणारे होते हे 8 पराभव
दुसऱ्या बाजूला अर्जेंटीनाचा शेवटचा सामना जो असेल तो मेस्सीचा वर्ल्ड कपमधील शेवटचा सामना असणार आहे. सात वेळा जगातील सर्वोत्तम खेळाडु ठरलेल्या मेस्सीला आता वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल. अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यातील ही लढत दोन्ही संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brazil, FIFA, FIFA World Cup