दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला २-१ अशा फरकाने मालिका गमवावी लागली होती. विशेष म्हणजे दोन कसोटी सामन्यात ७ विकेटने पराभव झाला होता. भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती. या पराभवानंतर इतकी टीका झाली की विराटला त्याचे कसोटी कर्णधारपद सोडावे लागले. भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असणाऱ्या विराटला अशा पद्धतीने त्याचं नेतृत्व सोडावं लागलं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला २-१ अशा फरकाने मालिका गमवावी लागली होती. विशेष म्हणजे दोन कसोटी सामन्यात ७ विकेटने पराभव झाला होता. भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती. या पराभवानंतर इतकी टीका झाली की विराटला त्याचे कसोटी कर्णधारपद सोडावे लागले. भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असणाऱ्या विराटला अशा पद्धतीने त्याचं नेतृत्व सोडावं लागलं.
जून-जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी मालिकेत विजयाची संधी होती. सुरुवातीच्या सामन्यात भारताने चांगला खेळही केला. मात्र पाचव्या सामन्यात गोलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली. कसोटी सामन्यात चौथ्या डावात इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांची गरज होती. तरीही भारतीय संघाला ७ विकेटने पराभूत व्हावं लागलं.च भारताचे गोलंदाज जो रूट आणि जॉनी बेअरस्टोसमोर निष्प्रभ ठरले. दोघांनी शतके करत कसोटी मालिका बरोबरीत ठेवली. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला वर्षाच्या सुरुवातीलाच ३-० ने लोळवलं होतं. तिन्ही सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने धूळ चारली. या मालिकेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात भारतीय संघ ढेपाळलेला दिसला.
घरच्या मैदानावरही दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. टी२० मालिकेत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उतरला होता. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी होती. मालिकेतील पहिले दोन सामने आफ्रिकेचा पराभव झाला होता. पण यानंतर एक सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. तर उर्वरित दोन सामने जिंकून आफ्रिकेने या मालिकेत बरोबरी साधली होती.
टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. मात्र सेमीफायनलमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडकडून १० विकेटने भारताचा पराभव झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अॅडलेडवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाला धूळ चारली. भारताने २०१३ मध्ये अखेरचा आयसीसी चषक जिंकला होता. तर २००७ मध्ये टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.
टी२० वर्ल्ड कपमनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला. तिथे टी२० मालिकेत १-० ने विजय मिळवला मात्र त्यानंतर एकदिवसीय मालिकेत पराभूत व्हावं लागला. ३ सामन्यांच्या मालिकेत पावसाने दोन सामने वाया गेले. त्याआधी पहिल्या सान्यात भारताला न्यूझीलंडने ७ गडी राखून पराभूत केले. भारताने २०२२ मध्ये दुसरी द्विपक्षीय मालिका गमावली.
बांगलादेशविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला बांगलादेशच्या अखेरच्या जोडीने हरवले. मेहदी हसन आणि मुस्तफिजूर रहमान यांनी अखेरच्या गड्यासाठी ५१ धावांची भागिदारी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला. तर दुसऱ्या सामन्यात भारताचा ५ धावांनी निसटता पराभव झाला. यासह बांगलादेशने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.