जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : मेस्सीची जादू अन् अल्वारेजची कमाल; अर्जेंटिनासाठी केलेला तिसरा गोल एकदा बघाच

VIDEO : मेस्सीची जादू अन् अल्वारेजची कमाल; अर्जेंटिनासाठी केलेला तिसरा गोल एकदा बघाच

VIDEO : मेस्सीची जादू अन् अल्वारेजची कमाल; अर्जेंटिनासाठी केलेला तिसरा गोल एकदा बघाच

अल्वारेजने तो बॉल गोलपोस्टमध्ये असा मारला की क्रोएशियाच्या गोलिकीपरला तो अडवण्यासाठी कसलीच संधी मिळाली नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सीसाठी फिफा वर्ल्ड कप २०२२ हा अखेरचा वर्ल्ड कप आहे आणि यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अशाच अंदाजात मेस्सी खेळताना दिसत आहे. मेस्सी मॅजिकच्या जोरावर अर्जेंटिनाने क्रोएशियाला हरवून फायनलमध्ये धडक मारली. अर्जेंटिनाने ३-० अशा गोल फरकाने क्रोएशियाविरुद्ध विजय मिळवला. या सामन्यात तिसरा गोल अद्भुत असा होता. मेस्सीने बॉल अल्वारेजकडे पास केला अन् तितक्याच वेगाने अल्वारेजनं तो गोलपोस्टमध्ये धाडला. मेस्सीने असिस्ट केलेल्या अल्वारेजच्या या गोलने अर्जेंटिनाचा फायनलमधला प्रवेश निश्चित केला होता. अर्जेंटिनासाठी मेस्सीने पेनल्टीवर पहिला गोल केला होता. त्यानंतर ज्युलियन अल्वारेजने क्रोएशियाच्या एक-दोन नव्हे तर तिघांना चकवत केलेला गोलही अफलातून असा होता. मात्र, सामन्याच्या ६९ व्या मिनिटाला मेस्सीच्या मदतीने अल्वारेजने केलेल्या गोलची चर्चा आहे. हेही वाचा :   FIFA 2022 : मेस्सीने रचला इतिहास, दिग्गज पेलेंच्या विक्रमावर नजर सेमीफायनलमध्ये ६९ व्या मिनिटाला मेस्सीने बॉलचा ताबा घेतला. त्यानतंर मेस्सीने क्रोएशियाच्या सर्वोत्तम डिफेंडर्सना चकवत चेंडू गोलपोस्टजवळ आणला. तेव्हा थेट गोलपोस्टमध्ये न मारता अल्वारेजकडे बॉल पास केला. अल्वारेजने तो चेंडू असा मारला की क्रोएशियाच्या गोलिकीपरला तो अडवण्यासाठी कसलीच संधी नव्हती. हेही वाचा :  FIFA World Cup: फुटबॉलचा 200 वर्ष जुना खजिना नागपुरात! पाहा Video क्रोएशिया आणि अर्जेंटीना यांच्यातला सामना रंगतदार होईल अशी शक्यता होती, मात्र अर्जेंटिनाने एकतर्फी विजय मिळवला. क्रोएशियाने अर्जेंटिनापेक्षा जास्त वेळ चेंडूवर ताबा ठेवला, पण त्यांना गोल करण्यात अपयश आलं. गेल्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाला क्रोएशियाने लीग स्टेजमध्ये हरवलं होतं. त्या पराभवाची परतफेड अर्जेंटिनाने केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात