जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / FIFA 2022 : मेस्सीने रचला इतिहास, दिग्गज पेलेंच्या विक्रमावर नजर

FIFA 2022 : मेस्सीने रचला इतिहास, दिग्गज पेलेंच्या विक्रमावर नजर

FIFA 2022 : मेस्सीने रचला इतिहास, दिग्गज पेलेंच्या विक्रमावर नजर

फिफा वर्ल्ड कपमध्ये मेस्सी गोल्डन बूटचा दावेदार आहे. मेस्सी आणि फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे या दोघांच्याही नावावर प्रत्येकी 5 गोल आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 डिसेंबर : मेस्सी मॅजिकच्या जोरावर अर्जेंटिनाने फिफा सेमीफायनलमध्ये क्रोएशियाला 3-0 ने पराभूत केलं. सेमीफायनलमध्ये मेस्सीने अर्जेंटिनासाठी पहिला गोल केला. तर ज्युलियन अल्वारेजने दोन गोल गेले. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये मेस्सीने आतापर्यंत 5 गोल केले आहेत. लियोनेल मेस्सीने यासह अर्जेंटिनाचा महान खेळाडु ग्रॅबियल बटिस्टुटाचा विक्रम मोडला. फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारा अर्जेंटिनाचा प्लेअर बनला आहे. बटिस्टुटाच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये 10 गोलची नोंद आहे तर मेस्सीचे 11 गोल झाले आहेत. डिएगो मॅराडोना यांनी 8 गोल केले होते. फिफा वर्ल्ड कपमध्ये मेस्सी गोल्डन बूटचा दावेदार आहे. मेस्सी आणि फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पे या दोघांच्याही नावावर प्रत्येकी 5 गोल आहेत. फायनलमध्ये मेस्सीच्या संघाचा सामना फ्रान्स किंवा मोराक्को यांच्याशी होईल. दुसरी सेमीफायनल फ्रान्स आणि मोराक्को यांच्यात होणार आहे.मेस्सी त्याच्या कारकिर्दीतला पाचवा फिफा वर्ल्ड कप खेळत आहे. यामध्ये त्याने 25 सामने खेळले असून यात 11 गोल केले आहेत. महान फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम मोडण्याची संधी त्याच्याकडे आहे. पेले यांनी 14 सामन्यात 12 गोल केले होते. हेही वाचा :   फिफा प्रत्येक संघाला देते 73 कोटी, वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणारी रक्कम माहितीय का? फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम जर्मनीच्या मिरास्लोवच्या नावावर आहे. त्याने 24 सामन्यात 16 गोल केले आहेत. त्याच्यानंतर ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डोचा नंबर लागतो. रोनाल्डोच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये 19 सामन्यात 15 गोलची नोंद आहे. तर तिसऱ्या नंबरवर वेस्ट जर्मनीचा गर्ड मूलर आहे. त्याने 14 गोल केले आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या जस्ट पोंटेनच्या नावावर 13 गोल आहेत. हेही वाचा :  लिलावासाठी प्लेअर्सची यादी जारी; 1 कोटी बेस प्राइज असणारे दोनच भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आहे. रोनाल्डोने 196 सामन्यात 118 गोल केले आहेत. त्याच्या नंतर इराणच्या अली देईचा नंबर लागतो. अली देईने 148 सामन्यात 109 गोल केले आहेत. तर मेस्सीने 171 सामन्यात 96 गोल केलेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात