मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची ‘फॅमिली’ वाढली, दोन नवे संघ लवकरच मैदानात

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची ‘फॅमिली’ वाढली, दोन नवे संघ लवकरच मैदानात

मुंबई इंडियन्सचे दोन नवे संघ

मुंबई इंडियन्सचे दोन नवे संघ

Mumbai Indians: रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि दक्षिण आफ्रिकेतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यूएईतल्या टी20 लीगमध्ये एमआय एमिरेट्स (MI Emirates) आणि दक्षिण आफ्रिकेत एमआय केपटाऊन (MI Cape Town’) हे संघ सहभागी होणार आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 10 ऑगस्ट: आयपीएलच्या मैदानात सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईच्या या संघात रोहितसह, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन अशा भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या शिलेदारांसह कायरन पोलार्डसारखा आंतरराष्ट्रीय टी20तला मोठा फलंदाजही आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं फॅन फॉलोईंग प्रचंड मोठं आहे. संघाचा प्रत्येक चाहता हा ‘एमआय फॅमिली’चा एक भाग बनून जातो. आणि मुंबई इंडियन्सची हीच ‘फॅमिली’ आता आणखी विस्तारणार आहे. कारण मुंबई इंडियन्सनं दोन नवे संघ विकत घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिका, यूएईत वाजणार मुंबईचा डंका

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडकडे मुंबई इंडियन्स संघाची मालकी आहे. गेली 15 वर्ष मुंबई इंडियन्स सातत्यानं चांगली कामगिरी बजावतोय. आणि रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि दक्षिण आफ्रिकेतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या दोन्ही लीगसाठी दोन नव्या संघांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली.

यूएईतल्या टी20 लीगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची एमआय एमिरेट्स (MI Emirates) आणि दक्षिण आफ्रिकेतल्या लीगसाठी एमआय केपटाऊन (MI Cape Town’) हे संघ सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - Asia Cup: ‘तो’ पुन्हा येणार…! श्रीलंकेच्या महान फलंदाजानं केलं भाकित!

नीता अंबानींकडून स्वागत

यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर नीता अंबानी यांनी या दोन्ही संघांचं स्वागत केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या, आमच्या एमआय फॅमिलीमध्ये आताच सामील झालेल्या MI Emirates आणि MI Cape Town या नव्या संघांचं स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आमच्यासाठी एमआय हे क्रिकेटपेक्षाही खूप काही आहे. एमआय नेहमीच नवी स्वप्न पाहण्याची आणि आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्याची ताकद देतं. मला खात्री आहे की एमआय एमिरेट्स आणि एमआय केपटाऊन हे दोन्ही संघही एमआयचा क्रिकेटचा वारसा जगात आणखी उंचीवर नेतील.

दरम्यान यूएई टी20 लीग आणि दक्षिण आफ्रिकेतील ट्वेन्टी ट्वेन्टी लीग स्पर्धा पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहेत.

First published:

Tags: Cricket, Mumbai Indians, Sports, T20 cricket