जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला तरी ब्राझीलच फुटबॉल किंग

अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला तरी ब्राझीलच फुटबॉल किंग

अर्जेंटिनाने फिफा वर्ल्ड कप जिंकला तरी ब्राझीलच फुटबॉल किंग

अर्जेंटिनाने १९८६ नंतर २०२२ मध्ये फिफा वर्ल्ड कप जिंकला. तरीही फुटबॉलमध्ये ब्राझीलच किंग ठरले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर : अर्जेंटिनाने 1986 नंतर 2022 मध्ये फिफा वर्ल्ड कप जिंकला. तरीही फुटबॉलमध्ये ब्राझीलच किंग ठरले आहे. या महिन्याच्या फिफा वर्ल्ड रँकिंगमध्ये ब्राझीलने त्यांचे पहिले स्थान कायम राखले आहे. ब्राझील फेब्रुवारी 2022 पासून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी बेल्जियमला मागे टाकून पहिलं स्थान पटकावलं होतं. क्वार्टर फायनलमध्ये ब्राझीलला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं. त्यानतंर अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला तरी ब्राझीलला ते मागे टाकू शकले नाहीत. ब्राझीलने फिफा वर्ल्ड कपमध्ये तीन सामने जिंकले. त्यांना ग्रुप स्टेजमध्ये कॅमेरूनकडून पराभूत व्हावं लागलं. तर क्वार्टर फायनलमध्ये क्रोएशियाने त्यांचा पराभव केला. हेही वाचा :  अंडे का फंडा मेस्सीसमोर फिका, रोनाल्डोला जमलं नाही ते मेस्सीच्या पोस्टने केलं अर्जेंटिनाने 2021 मध्ये कोपा अमेरिका आणि आता वर्ल्ड कप जिंकला. मात्र पहिलं स्थान पटकावण्यासाठी इतकं पुरेसं नव्हतं. पेनल्टी शूटआऊट विजयाचे गुण हे रेग्युलेशन टाइम विजयाच्या तुलनेत कमी आहेत. जर फ्रान्स किंवा अर्जेंटिना अतिरिक्त वेळेतसह 120 मिनिटांच्या आत जिंकले असते तरी ते पहिल्या क्रमांकावर असते. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांनी एका स्थानाने झेप घेतली असून अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. ब्लेजियम ग्रुप स्टेजमध्ये वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याने दोन स्थानांनी खाली घसरला असून चौथ्या स्थानी पोहोचले आहे. तर इंग्लंड पाचव्या आणि नेदरलँड सहाव्या स्थानावर आहे. हेही वाचा :  मेस्सीची हटके लव्हस्टोरी, बचपन का प्यार; दुराव्यानंतर एका अपघातामुळे पुन्हा आले एकत्र क्रोएशिया फिफा वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यांना रँकिंगमध्ये सातवे स्थान देण्यात आले आहे. त्यांनी तब्बल पाच स्थानांची झेप घेत टॉप 10 मध्ये स्थान पटकावलं. क्वालिफाय होण्यात अपयशी ठरलेला इटलीचा संघ आठव्या स्थानी घसरला तर पोर्तुगाल नवव्या स्थानी कायम आहे. स्पेनची तीन स्थानांनी घसरण झाली असून ते दहाव्या स्थानावर आहेत. मोराक्को आणि ऑस्ट्रेलियाने 11 स्थानांनी झेप घेतली आहे. मोराक्को रँकिंगमध्ये 11 व्या स्थानावर आहेत. तर ऑस्ट्रेलिया 27 व्या स्थानी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात