advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / अंडे का फंडा मेस्सीसमोर फिका, रोनाल्डोला जमलं नाही ते मेस्सीच्या पोस्टने केलं

अंडे का फंडा मेस्सीसमोर फिका, रोनाल्डोला जमलं नाही ते मेस्सीच्या पोस्टने केलं

फिफा वर्ल्ड कप २०२२ अर्जेंटिनाने जिंकला आणि मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालं. या विजयासह मेस्सीने अनेक विक्रमही मोडले आहेत. फिफा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर केलेल्या मेस्सीच्या पोस्टसमोर 'अंडे का फंडा' फिका पडला. सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या रोनाल्डोलासुद्धा हे जमलं नव्हतं.

01
लियोनेल मेस्सीने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरुद्ध दोन गोल करून अनेक विक्रम केले. आता मेस्सीने मैदानाबाहेर विक्रम केले आहेत. वर्ल्ड कप विजयानंतर त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टने ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मागे टाकला आहे. याशिवाय जगातल्या सर्वाधिक लाइक्स असणाऱ्या पोस्टचा विक्रम मोडला.

02
अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने पराभूत केलं. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं असून याआधी त्यांनी 1986 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयानंतर मेस्सीने त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते.

03
लियोनेल मेस्सीने म्हटलं की, अनेकदा मी याचं स्वप्न पाहिलं, एवढंच वाटत होतं की मी पडू नये, मला विश्वास बसत नाही. .. माझ्या कुटुंबाचे, पाठिराख्यांचे आणि ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचे आभार. आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं की अर्जेंटिनाचे लोक जेव्हा एकत्र होऊन लढतात आणि आपलं ध्येय निश्चित करतात तेव्हा ते पूर्ण करण्यास सक्षम असतात.

04
फ्रान्सविरुद्ध विजयानंतर अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सीने केलेली पोस्ट ही एका खेळाडुची सर्वाधिक लाइक करण्यात आलेली पोस्ट ठरली आहे.  ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या बुद्धीबळ खेळणाऱ्या प्रसिद्ध फोटोच्या पोस्टलाही याबाबत मागे टाकलं आहे.

05
मेस्सीच्या फिफा वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच्या पोस्टला 20 डिसेंबर 2022 पर्यंत 5 कोटी, 75 लाख 37 हजार 436 लाइक्स मिळाले आहेत. यासह मेस्सीची पोस्ट जगात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लाइक्स मिळवणारी पोस्ट ठरली आहे.

06
मेस्सीची पोस्ट ही इन्स्टावर सर्वाधिक लाइक झालेल्या पोस्टमध्ये मात्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर याआधी विश्वविक्रमी अंड्याचा फोटो पहिल्या स्थानावर होता. या अंड्याच्या फोटोला 55.8 मिलियन लाइक्स मिळाले होते. या फोटोने 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत 5 कोटी 57 लाख 46 हजार 40 लाइक्स मिळवले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • लियोनेल मेस्सीने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरुद्ध दोन गोल करून अनेक विक्रम केले. आता मेस्सीने मैदानाबाहेर विक्रम केले आहेत. वर्ल्ड कप विजयानंतर त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टने ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम मागे टाकला आहे. याशिवाय जगातल्या सर्वाधिक लाइक्स असणाऱ्या पोस्टचा विक्रम मोडला.

    MORE
    GALLERIES