मुंबई, 20 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कप 2022 मधील चित्तथरारक विजयानंतर अर्जेंटिना देश आणि त्याची फुटबॉल टीम चांगलीच चर्चेत आहे. या विजेतेपदानंतर अनेकांना अर्जेटिंनानं 1978 साली पहिल्यांदा मिळवलेल्या विजेतेपदाची आठवण झाली. डॅनियल पासरेला यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं त्यावेळी फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. अर्जेंटिनाच्या या विजयामागे अतिशय रंजक कथा आहे.
अर्जेंटिनाचे तत्कालीन फुटबॉल टीम व्यवस्थापक सीझर मेनोट्टी यांनी पाकिस्तानच्या हॉकी टीमचे व्यवस्थापक अब्दुल वाहिद खान यांच्याकडून प्रेरणा घेतली होती, असं म्हटलं जातं. पाकिस्तानच्या टीमनं त्याच वर्षी (1978) हॉकी वर्ल्ड कप जिंकला होता. ही स्पर्धा देखील अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्समध्ये खेळवण्यात आली होती.
काय आहे इतिहास?
'द पेपरक्लिप' मधील एका ट्विटर थ्रेडनं अर्जेंटिनाला 1978 मध्ये विजय मिळवण्यासाठी प्रेरित केलेल्या कथेचा शोध लावला आहे. 1978मध्ये अर्जेंटिनानं मार्च महिन्यात हॉकी वर्ल्ड कप आणि त्यानंतर जून महिन्यात फुटबॉल वर्ल्ड कपचं (फिफा) यजमानपद भूषवलं होतं. ब्युनोस आयर्स येथे आलेल्या पाकिस्तानच्या हॉकी टीमनं तत्कालीन व्यवस्थापक आणि माजी सुवर्णपदक विजेते खेळाडू अब्दुल खान यांच्या व्यवस्थापनाखाली उत्कृष्ट कामगिरी केली होती. पाकिस्तानच्या टीमनं नेदरलँड्सचा पराभव करून हॉकी वर्ल्ड कप जिंकला होता. या ट्विटनुसार पाकिस्ताननं संपूर्ण हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी 35 गोल केले होते आणि समोरच्या टीमला फक्त चार गोल करू दिले होते.
When Argentina lifted their first-ever FIFA World Cup in 1978, a remarkable Pakistani born in Bhopal left his indelible mark by helping the Argentines win the prestigious trophy. It is story time and we fly to Buenos Aires. A thread (1/18) pic.twitter.com/JomI2yAOtg
— The Paperclip (@Paperclip_In) December 18, 2022
पाकिस्तानच्या या स्टायलिश खेळानं अनेकांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या होत्या. यामध्ये अर्जेंटिना फुटबॉल टीमचे बंडखोर प्रशिक्षक मेनोट्टी यांचाही समावेश होते. मनोट्टी हॉकी वर्ल्ड कप पाहण्यासाठी गेले होते. मेनोट्टीच्या मनावर पाकिस्तानच्या हॉकी टीमचा इतका प्रभाव पडला की केवळ मॅचच नव्हे, तर सराव आणि प्रशिक्षण सत्रांना मेनोट्टी हजर राहू लागले. या माध्यमातून मेनोट्टीनं आपल्या फुटबॉल टीमसाठी भरपूर नोट्स काढल्या होत्या.
भारताशी होते कनेक्शन
पाकिस्तान हॉकी टीमचे व्यवस्थापक अब्दुल खान हे भारतातील भोपाळ जिल्ह्यातील रायपूरमध्ये जन्मलेले होते. 1949 मध्ये ते पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. त्यांनी मेनोट्टी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही चर्चा मुख्यतः पाकिस्तान हॉकी टीमच्या मॅचमधील आक्रमणाच्या रणनीतीवर केंद्रित होती.
फिफा ट्रॉफी घेताना मेस्सीने घातलेल्या ब्लॅक ड्रेसची होतेय चर्चा, काय आहे कारण?
ट्विटर थ्रेडमध्ये असं लिहिलं गेलं आहे की, त्यांनी दुहेरी आक्रमणाच्या रणनीतीवर चर्चा केली होती. म्हणजे अगोदर उजव्या बाजूनं चाल करायची. प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीचं लक्ष याकडे केंद्रित झाल्यानंतर ताबडतोब डावीकडून चाल करायची, अशी ती रणनीती होती.
त्यानंतर, 25 जून 1978 रोजी, अर्जेंटिनानं फिफा फायनलमध्ये हॉलंडला पराभूत करून प्रथमच फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला. स्पर्धा संपल्यानंतर मेनोट्टी यांनी अब्दुल खान यांना एक तार पाठवली होती. पाकिस्तानच्या हॉकी टीमची चाल करण्याची रणनीती अर्जेंटिनासाठी कशी उपयोगी पडली, हे त्यांनी यामध्ये मान्य केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA, FIFA World Cup, Football