मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /फिफा ट्रॉफी घेताना मेस्सीने घातलेल्या ब्लॅक ड्रेसची होतेय चर्चा, काय आहे कारण?

फिफा ट्रॉफी घेताना मेस्सीने घातलेल्या ब्लॅक ड्रेसची होतेय चर्चा, काय आहे कारण?

विजयानंतर मेस्सी जेव्हा वर्ल्ड कपची ट्रॉफी घेण्यासाठी व्यासपीठावर गेला तेव्हा त्याला एक ब्लॅक ड्रेस घालण्यात आला. इतर खेळाडू जर्सीमध्ये असताना मेस्सीने घातलेल्या या ब्लॅक ड्रेसची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

विजयानंतर मेस्सी जेव्हा वर्ल्ड कपची ट्रॉफी घेण्यासाठी व्यासपीठावर गेला तेव्हा त्याला एक ब्लॅक ड्रेस घालण्यात आला. इतर खेळाडू जर्सीमध्ये असताना मेस्सीने घातलेल्या या ब्लॅक ड्रेसची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

विजयानंतर मेस्सी जेव्हा वर्ल्ड कपची ट्रॉफी घेण्यासाठी व्यासपीठावर गेला तेव्हा त्याला एक ब्लॅक ड्रेस घालण्यात आला. इतर खेळाडू जर्सीमध्ये असताना मेस्सीने घातलेल्या या ब्लॅक ड्रेसची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात विजय मिळवून अर्जेंटिनाने ३६ वर्षांनी पुन्हा विजेतेपदावर नाव कोरलं. यामुळे अखेरचा वर्ल्ड कप खेळणाऱ्या मेस्सीचं स्वप्नही पूर्ण झालं. विजयानंतर मेस्सी जेव्हा वर्ल्ड कपची ट्रॉफी घेण्यासाठी व्यासपीठावर गेला तेव्हा त्याला एक ब्लॅक ड्रेस घालण्यात आला. इतर खेळाडू जर्सीमध्ये असताना मेस्सीने घातलेल्या या ब्लॅक ड्रेसची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात परंपरेनुसार पुरस्कार, मेडल्स आणि ट्रॉफी देण्यात आले. यात सुरुवातीला अर्जेंटिनाच्या सर्व खेळाडूंना मेडल्स घालण्यात आली. त्यानंतर कर्णधार असल्याने मेस्सी सर्वात शेवटी आला. त्यालाही मेडल घातलं गेलं. तर कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांनी एक खास असा ड्रेस मेस्सीला घातला. काळ्या रंगाचा हा ड्रेस जाळीदार कापडापासून तयार करण्यात आला होता. मेस्सीने हाच ड्रेस घालून वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली आणि अर्जेंटिनाच्या संघासोबत जल्लोषही केला. फोटो सेशनवेळीही मेस्सी हाच ड्रेस घालून होता.

हेही वाचा : FIFA World Cup : अर्जेंटिनाच्या विजयानंतर मेस्सीच्या पत्नीची पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली....

कतारमध्ये या ड्रेसला विशेष महत्त्व आहे. विशेष प्रसंगी हा ड्रेस घालण्यात येतो. स्पर्धेचे आयोजन समितीचे महासचिव हसन अल थवाडी यांनी सांगितले की, मेस्सीच्या विजयाचा गौरव म्हणून त्याला हा ड्रेस दिला गेला. या ड्रेसला बिश्ट असंही म्हटलं जातं. हा अरब देशांचा एक सांस्कृतिक वारसा असलेला ड्रेस असून विशेष प्रसंगी हा घालण्यात येतो. वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्जेंटिनाचा विजय मेस्सीसाठी स्पेशल असल्यानं हा क्षण आणखी अविस्मरणीय करण्यासाठी मेस्सीला हा ड्रेस देण्यात आला होता.

हेही वाचा : एक क्रिकेटचा देव अन् दुसरा फुटबॉलचा; सचिन मेस्सीचा वर्ल्ड कपचा सेम टू सेम प्रवास

दरम्यान, मेस्सीला ब्लॅक ड्रेस घातल्याने आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक युजर्नसी ट्विटरवर म्हटलं की, या ड्रेसने मेस्सीच्या जादुई नंबरला झाकलं. तो नंबर त्याची ओळख आहे. तर अनेक लोकांनी विजयाच्या क्षण साजरा करताना मेस्सीला काळा ड्रेस घातल्याच्या प्रकारावर आयोजकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: FIFA, FIFA World Cup