मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

नेमारने केली पेलेंच्या विक्रमाशी बरोबरी, पण ब्राझीलच्या पराभवाने रडवले

नेमारने केली पेलेंच्या विक्रमाशी बरोबरी, पण ब्राझीलच्या पराभवाने रडवले

फिफा वर्ल्ड कपमध्ये ब्राझीलला पेनल्टी शूट आऊटमध्ये क्रोएशियाकडून पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमारला अश्रू रोखता आले नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 09 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये नेमारने ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करण्याच्या पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण फिफा वर्ल्ड कपमध्ये ब्राझीलला पेनल्टी शूट आऊटमध्ये क्रोएशियाकडून पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमारला अश्रू रोखता आले नाही. पेनल्टी शूटआऊट संपल्यानंतर नेमार मैदानात बसूनच रडत होता. इतर खेळाडु त्याला आधार देण्याचा प्रयत्न करत होते. नेमारने त्याचा सहकारी खेळाडू दानी एल्वेससोबत मैदान सोडलं तेव्हाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.

वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा नेमारच्या पदरी निराशा पडली. ब्राझीलला वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याला यश आलं नाही. वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्यांदा नेमारला अपयशाचा सामना करावा लागला. ब्राझीलला त्याने २०१३ मध्ये कन्फेडरेशन कप आणि २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. तेव्हा ब्राझीलने पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं.

हेही वाचा : टीम इंडियासमोर क्लीन स्वीपचा धोका; तिसऱ्या वन-डेसाठी कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

नेमारने क्रोएशियाविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना म्हटलं की, ही वेळ ब्राझीलच्या संघातील माझ्या भविष्याबद्दल बोलण्याची नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला नाही माहिती की पुढे काय होणार आहे. यावर आता बोलणं कठीण आहे. तसंच आता बोलणं हे घाईचं ठरेल. मी कशाचीही खात्री देऊ शकत नाही. मला यावर विचार करण्यासाठी आणखी काही वेळ हवा आहे.

हेही वाचा : सेहवागचे सिक्सर्स पाहून 'तो' रडला होता... आज त्यानं इंग्लंडला रडवलं! कोण आहे हा नवा मिस्ट्री स्पिनर?

ब्राझीलकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम महान फुटबॉलपटू पेले यांचा आहे. त्यांनी ७७ गोल केले आहेत. पेले यांच्या या विक्रमाची बरोबरी नेमारने शुक्रवारी केली.

First published:

Tags: Brazil, FIFA, FIFA World Cup