मुलतान, 09 डिसेंबर: 18 वर्षांपूर्वी भारतानं पाकिस्तानचा दौरा केला होता. 2004 सालच्या त्या दौऱ्यातील मुलतान कसोटीत टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनं त्रिशतक ठोकलं होतं. तो सामना पाहत होता पाकिस्तानचा सध्याचा युवा लेग स्पिनर अबरार अहमद. सेहवागनं त्यावेळी सकलेन मुश्ताकची केलेली धुलाई पाहून 6 वर्षांचा अबरार चक्क रडला होता. याच अबरार अहमदनं आज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण केलं. आणि पहिल्याच मॅचमध्ये त्यानं इंग्लिश फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं. पहिल्या 7 विकेट्स अबरारच्या नावावर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीतही दमदार सुरुवात केली. पण पदार्पण करणारा अबरार बॉलिंगला आला आणि त्यानं डावाचा रंगच पालटला. एकेक करत त्यानं इंग्लंडच्या फलंदाजांना माघारी धाडलं. पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंडची 7 बाद 231 अशी अवस्था झाली होती. त्या सातही विकेट्स अबरारनंच काढल्या. त्यामध्ये जो रुट, बेन स्टोक्स या मातब्बर फलंदाजांचाही समावेश होता. त्यावेळी तो 10 विकेट्स घेऊन इतिहास घडवणार का? अशीही चर्चा सुरु झाली. पण त्याचा सहकारी झैद मोहम्मदनं पुढच्या 3 विकेट्स घेऊन इंग्लंडचा पहिला डाव 281 धावात गुंडाळला.
What a dream delivery by Abrar Ahmed to dismiss Ben Stokes. Stokes is stunned.#AbrarAhmed #PAKvENG pic.twitter.com/u89jrMZJJE
— IPL 2024 (@2024_IPL) December 9, 2022
कोण आहे अबरार अहमद? 24 वर्षांचा लेग स्पिनर अबरार अदमदनं मुलतान कसोटीत पाकिस्तानकडून पदार्पण केलं. त्यानं याआधी अंडर-19 क्रिकेट, आझम ट्रॉफी आणि पीएसएलसारख्या स्पर्धा खेळल्या आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर रशीद लतीफच्या अकादमीत त्यानं क्रिकेटचे धडे गिरवले. तिथूनच त्याच्या क्रिकेट करीअरनं आकार घेतला. अबरार अहमद वेस्ट इंडिजचा मिस्ट्री स्पिनर सुनील नरेन याचा फॅन आहे.
Abrar Ahmed, What a debut man!#abrarahmed #PakvsEng2022
— Maham Gillani (@dheetafridian__) December 9, 2022
pic.twitter.com/7LLwBfLGrS
हेही वाचा - Cricket: भन्नाट टेक्नोलॉजी! दोन बॅट्समन मैदानात काय बोलतात? आता थेट ऐका… पाहा Video यासिर शाह योग्य पर्याय? गेली अनेक वर्ष अनुभवी गोलंदाज यासिर शाहनं लेग स्पिनर म्हणून पाकिस्तानी संघात भक्कम स्थान निर्माण केलं होतं. पण तो सध्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. पण पहिल्याच मॅचमध्ये डावात 7 विकेट्स घेणाऱ्या अबरारनं यासिरच्या जागेवर आता आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

)







