मुंबई, 12 डिसेंबर : मोराक्कोचा स्टार डिफेंडर अशरफ हकिमीने त्याच्या आईसोबत संघाच्या विजयाचा जल्लोष केल्यानंतर जोरदार चर्चा झाली होती. फिफा वर्ल्ड कपमध्ये मोराक्कोच्या संघाने प्री क्वार्टर फायनलमध्ये स्पेनला पराभूत केलं. या विजयानंतर प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या आपल्या आईकडे जात हकिमीने सेलिब्रेशन केलं होतं. क्वार्टर फायनलमध्ये रोनाल्डोच्या पोर्तुगालला पराभूत केल्यानतंर हकिमीच्या पत्नीच्या फोटोंवरून वाद निर्माण झाला आहे. हकिमीची पत्नी हिबा अबूक ही स्पॅनिश अभिनेत्री आहे. तिच्या फोटोवरून बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्विट केलं आहे. हेही वाचा : VIDEO : सऊद शकीलच्या विकेटवरून वाद, पंचांच्या चुकीचा पाकिस्तानला फटका? तस्लीमा नसरीन यांनी म्हटलं की, “अशरफ हकिमी आणि त्याची पत्नी मुस्लीम आहेत. पण हकिमीची पत्नी बुरखा आणि हिजाब घालत नाही.” तस्लीमा नसरीन यांनी हिबा अबूक आणि अशरफ यांचे काही फोटोही शेअर केले आहेत.
Morocco's star footballer Achraf Hakimi and his wife. They are Muslims and they are not wearing burqa or hijab. pic.twitter.com/NxVfWwB9Jm
— taslima nasreen (@taslimanasreen) December 12, 2022
फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पेनला हरवल्यानंतर हकिमीने प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या आईचे चुंबन घेतले होते. यावर त्याचं कौतुकही झाले आणि वादही निर्माण झाला. या गोष्टीला वेगवेगळा रंग देण्याचा प्रयत्न झाला. हेही वाचा : WTC Point Table : फायनलच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर, भारताला संधी मिळणार का? हिबा अबूक ही प्रसिद्ध स्पॅनिश अभिनेत्री आहे. तिने न्यूड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली होती. तिचे वडील लिबियाचे तर आई ट्युनेशियाची आहे. तिचे आई-वडिल ट्युनेशियाहून नंतर स्पेनमध्ये स्थायिक झाले होते. हिबाचं शिक्षण मद्रिदमधील फ्रेंच स्कूलमध्ये झालं. याशिवाय तिने इस्लामिक पद्धतीने शिक्षणही घेतलंय. अरबी भाषाशास्त्राचा अभ्यास केला असून RESAD मध्ये पदवी घेतली आहे. स्पॅनिश, अरबी या भाषांशिवाय ती फ्रेंच, इंग्लिश आणि इटालियन भाषा बोलते. अशरफ हकिमीची पत्नी हिबा अबूक हिने २००८ मध्ये टीव्ही मालिका एल सिंड्रोम डी उलीसच्या एका एपिसोडमधून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं होतं. हिबा अबूक ही बिनधास्त असून आपली मते ती ठामपणे मांडते. अशरफसुद्धा पत्नी हिबाच्या या स्वभावाचं कौतुक करतो.