मुंबई, 12 डिसेंबर : मुल्तान कसोटीत पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडकडून २६ धावांनी पराभूत व्हावं लागलं. पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण जेम्स अँडरसन, मार्क वूड आणि ओली रॉबिन्सन यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना संधीच दिली नाही. या पराभवासह बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानच्या पराभवामुळे भारतीय संघाला मात्र फायदा झाला आहे. पाकिस्तानला डिसेंबर अखेरीस त्यांच्याच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. कसोटी चॅम्पियनशिप प्रमाणेच पाकिस्तानची ही अखेरची मालिका असणार आहे. दोन्ही सामन्यात त्यांनी विजय मिळवला तरीही त्यांना टॉप २ मध्ये पोहोचणार नाहीत. हेही वाचा : पुजाराला उपकर्णधार केल्यानं वाद; केएल राहुल म्हणाला, ‘निवड कशी करतात माहिती नाही’ ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या ७५ टक्के विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका ६० टक्के विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर श्रीलंकेचा संघ ५३.३३ अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे. यानंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतीय संघांची टक्केवारी ५२.०८ इतकी आहे. इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानी घसरला आहे. तर इंग्लंडचा संघ पाचव्या क्रमांकावर आलाय. हेही वाचा : आयर्लंड क्रिकेट बोर्डाच्या ऑफरवर संजू सॅमसननं दिलेलं उत्तर वाचून वाटेल अभिमान! जून २०२३ मध्ये लंडनमधील ओव्हलवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. याआधी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून यात चार सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे. भारताला टॉप २ मध्ये जागा पटकावण्यासाठी बांगलादेश विरुद्ध दोन्ही सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवावा लागेल. जर भारताने ही कामगिरी केली तर सहज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करता येईल. तसंच भारतीय संघाला अशी कमाल करता आली नाही तर इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.