लंडन 12 जुलै : लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या महामुकाबल्यात इटलीने यूरो कप 2020 च्या विजेतेपदाचा मान पटकावला (Italy Win on Penalties) आहे. यूरो स्पर्धेच्या फायनलच्या (UEFA EURO 2020 Final) इतिहासात सर्वात वेगवान गोलचा विक्रम इंग्लंड विरुद्ध इटली (Italy vs England) यांच्यातल्या या सामन्यात नोंदवला गेला आहे. इंग्लंडनं 1.57 मिनिटालाच गोल खातं उघडलं, मात्र इटलीनं दुसऱ्या हाफमध्ये बरोबरीचा गोल करून इंग्लंड समर्थकांचा स्वप्नभंग केला. 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल समोर आला नव्हता. मात्र, अखेर निकाल समोर आला आणि 55 वर्षांपासूनचं इंग्लंडचं स्वप्न यंदाही अपूरंच राहिलं. शफाली वर्मा आणि फिल्डिंग! टीम इंडियाचा रोमांचक विजय, सीरिजमध्येही कमबॅक इटलीनं 1-1 अशी बरोबरी करत हा सामना सांभाळला. या सामन्यात इटलीनं बाजी मारली आणि वेम्बली स्टेडियमवर एकच शांतता पसरली. सामन्यात इटलीनं 1-1 (3-2) असा विजय (Italy Win Euro 3-2 on Penalties) मिळवला. सामन्यात पहिल्या सत्रापासून इंग्लंडची आक्रमक खेळी पाहायला मिळाली. सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉ यानं गोल झळकावत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्याच मिनीटाला इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली. यूरो फायनलमधील हा सर्वात जलद गोल ठरला. त्यामुळे इटलीच्या संघावर दडपण होतं. मात्र दुसऱ्या सत्रात चित्र बदललं आणि इटलीनं जोरदार कमबॅक केलं. 67 व्या मिनिटाला इटलीचा खेळाडू लिओनार्डो बोनच्चीने गोल करत इंग्लंडशी बरोबरी केली. पहिल्या सेशनमध्ये इटलीकडे सर्वाधिक वेळ चेंडूचा ताबा होता, परंतु त्याचा फारसा फायदा त्यांना झाला नाही.
🇮🇹 Scenes as Italy become EURO 2020 winners! 🥳#EURO2020 | #ITA pic.twitter.com/9lcOqsP7r7
— UEFA EURO 2024 (@EURO2024) July 11, 2021
…म्हणून द्रविडने टीम इंडियाचा कोच होऊ नये, जाफरने सांगितलं कारण यूरो स्पर्धेच्या फायनलमध्ये गोल करणारा बोनसी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. 34 वर्ष व 71 दिवसांच्या बोनसीनं गोल करून 1976 साली बेर्न्ड होलझेमबेन यांचा विक्रम मोडला. यामुळे इटलीचा खेळ बदलला आणि त्यांनी आक्रमक खेळी सुरू केली. दोन्ही संघांना 90 मिनिटांच्या खेळात विजयी गोल झळकावता आला नाही. त्यामुळे 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. परंतु, तिथेही दोन्ही संघ विजय मिळवण्यास अपयशी ठरले. यानंतर अखेर या सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. यात इटलीनं हा सामना जिंकला. यूरो कप 2020 स्पर्धेत इटलीने एकही सामना गमावला नाही.