जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ...म्हणून द्रविडने टीम इंडियाचा कोच होऊ नये, जाफरने सांगितलं कारण

...म्हणून द्रविडने टीम इंडियाचा कोच होऊ नये, जाफरने सांगितलं कारण

...म्हणून द्रविडने टीम इंडियाचा कोच होऊ नये, जाफरने सांगितलं कारण

टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर (Wasim Jaffer) हा त्याच्या भन्नाट मीम्समुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकत्याच एका व्हिडिओमध्ये जाफरने राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ नये, असं मत मांडलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जून : टीम इंडियाचा माजी ओपनर वसीम जाफर (Wasim Jaffer) हा त्याच्या भन्नाट मीम्समुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या वसीम जाफरने त्याचं युट्यूब चॅनलही सुरू केलं आहे. यावर तो क्रिकेटबद्दलची त्याची मतं स्पष्टपणे मांडतो. नुकत्याच एका व्हिडिओमध्ये जाफरने राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाचा प्रशिक्षक होऊ नये, असं मत मांडलं. जाफरचं हे मत ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या तरी त्याने याबाबतचं कारणही सांगितलं आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविडची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली, त्यामुळे आता द्रविड येत्या काही दिवसात टीम इंडियाचा फूल टाईम कोच होईल, अशी चर्चा सुरू झाली, यावर जाफरने आपलं मत मांडलं आहे. भारताचा माजी कर्णधार असलेला राहुल द्रविड हा बराच काळ भारताची अंडर-19 टीम आणि इंडिया ए चा प्रशिक्षक होता, यानंतर तो एनसीएचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. राहुल द्रविडने अंडर-19 आणि इंडिया-ए च्या मुलांसोबत काम करावं, असं जाफर म्हणाला आहे. ‘श्रीलंका दौऱ्यासाठी द्रविड टीमचा प्रशिक्षक आहे. यामुळे दौऱ्यावर गेलेल्या युवा खेळाडूंना नक्की फायदा होईल, पण त्याला टीमचा फूल टाईम कोच बनवण्यात येऊ नये, अशा मताचा मी आहे. द्रविडने अंडर-19 टीम, इंडिया ए आणि एनसीएमध्ये काम पाहावं. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू आधीच तयार झालेले असतात,’ असं जाफर म्हणाला. ‘अंडर-19 आणि इंडिया ए मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शनाची गरज असते. द्रविड या मुलांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करू शकतो. त्याच्या मार्गदर्शनाची आणि प्रशिक्षणाची अंडर-19 आणि इंडिया-ए ला जास्त गरज आहे. वरच्या स्तरावर जाण्यासाठी युवा खेळाडूंना द्रविडच्या कोचिंगची गरज आहे, त्यामुळे त्याने एनसीएमध्ये राहावं,’ असं मत जाफरने मांडलं. एवढे उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याचं श्रेय द्रविड आणि बीसीसीआयला जातं, अशी प्रतिक्रिया जाफरने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात