नवी मुंबई, 08 मार्च : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेले 6 महिने दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मात्र नुकत्याच झालेल्या डीव्हाय पाटील टी-20 (DY Patil T20) स्पर्धेत पांड्याने जबरदस्त कमबॅक केला. हार्दिक पांड्याने अखेरच्या सामन्यात 55 चेंडूत 158 धावांची विक्रमी खेळी. त्यामुळं आता भारतीय संघाचे दरवाजे पुन्हा पांड्यासाठी उघडले आहेत. मात्र पांड्याच्या या खेळीनंतर नवी मुंबईच्या डीव्हाय पाटील मैदानावर मात्र चाहत्यांनी राडा घातला.
हार्दिक पांड्याच्या शानदार खेळीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पांड्याच्या तुफानी खेळीनंतर चाहते हार्दिक...हार्दिक ओरडताना दिसत आहेत. एवढेच नाही तर खेळाडूं खेळपट्टीवरच धिंगाणा घालताना दिसत आहेत. एवढेच नाही तर काही चाहत्यांनी खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्येही शिरण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी या बेधुंद चाहत्यांवर टीका केली आहे.
वाचा-VIDEO : 41 वर्षांचा जहीर खान झाला सुपरमॅन! हवेत उडी मारत घेतला शानदार कॅच
What crowds post the DY Patil t20 Cup! All rooting for just one man @hardikpandya7 #cricket pic.twitter.com/SCMWEJNmxd
— Chandresh Narayanan (@chand2579) March 6, 2020
चार सामन्यात 38 षटकारांसह केल्या 347 धावा
हार्दिक पांड्याने डीव्हाय पाटील टी -20 स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यात त्याने पहिल्या सामन्यात 4 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. यानंतर दुसर्या सामन्यात पांड्याने 10 षटकारांच्या मदतीने 105 धावा फटकावल्या. या सामन्यात त्याने 37 चेंडूत शतक पूर्ण केले. तिसर्या सामन्यात पांड्याने पुन्हा 4 षटकारांसह 46 धावा केल्या. आता चौथ्या सामन्यात त्याने 20 षटकारांच्या मदतीने 158 धावा केल्या. अशाप्रकारे पांड्याने चार सामन्यात 38 षटकारांच्या मदतीने 347 धावा केल्या आहेत.
वाचा-Road Safty World Series : पहिल्याच चेंडूवर सेहवागचा 'पुराना' अंदाज, पाहा VIDEO
गोलंदाजीतही हार्दिक पांड्याची यशस्वी कामगिरी
हार्दिक पांड्याने फलंदाजीने केवळ डीव्हाय पाटील टी -20 स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीने तुफान कामगिरी केली आहे. पहिल्या दोन सामन्यात पांड्याने 10 विकेट घेतल्या. पहिल्या सामन्यात पांड्याने 26 धावांत 5 बळी घेतले तर दुसर्या सामन्यात त्याने 26 धावा देऊन 5 बळी घेतले.
वाचा-हार्दिक पांड्याचा जलवा! 20 सिक्सर मारत अवघ्या 26 चेंडूत केल्या 144 धावा
भारतीय संघात मिळणार जागा?
हार्दिक पांड्याचा शानदार कमबॅक पाहता, त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होऊ शकते. हार्दिक पांड्या आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्यामुळे त्याला बाहेर ठेवण्याची शक्यता कमी आहे. या मालिकेत विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.