मेलानिया ट्रम्प यांची ताजमहाल भेट आणि पांढऱ्या जंपसूटचं भारतीय कनेक्शन

मेलानिया ट्रम्प यांची ताजमहाल भेट आणि पांढऱ्या जंपसूटचं भारतीय कनेक्शन

मेलानिया ट्रम्प यांनी जंपसूटवर हलक्या हिरव्या रंगाचा आणि सोनेरी टच असलेला बेल्ट बांधला होता. त्यांच्या या ड्रेसबद्दल डिझायनर्सनी इस्टाग्रामवर माहिती दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या दौऱ्यात त्यांची ताजमहाल भेट सगळ्यांच्याच लक्षात राहील. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात मेलानिया यांचा पांढरा जंपसूट खूपच आकर्षक दिसत होता. त्यांनी घातलेला हा जंपसूट अटेलियर काइटो फॉर हर्वे पियरे नावाच्या एका प्रसिद्ध फॅशन ब्रँडचा आहे.

मेलानिया यांनी जंपसूटवर हलक्या हिरव्या रंगाचा आणि सोनेरी टच असलेला बेल्ट बांधला होता. त्यांच्या या ड्रेसबद्दल डिझायनर्सनी इस्टाग्रामवर माहिती दिलीय.मेलानिया यांचा बेल्ट भारतीय वस्त्रांनी बनवलाय. हा बेल्ट मला माझ्या पॅरिसमधल्या मित्राकडे मिळाला, असं या डिझायनरने म्हटलंय. हा बेल्ट हिरव्या रंगाचं रेशीम आणि सोनेरी धातूच्या धाग्यांनी बनवलाय हेही त्यांनी सांगितलं.

हवामानानुसार मेकअप

मेलानिया यांनी हवामान लक्षात घेऊन क्रेप आणि सिल्कला पसंती दिली. त्यांनी केस मोकळे ठेवले आणि अगदी हलकासा मेकअप केला होता. मेलानिया यांच्या डिझायनर्सनी याआधी लॉरा बुश, हिलरी क्लिंटन, मिशेल ओबामा यांच्यासाठीही ड्रेस डिझाइन केले आहेत.

'वाह ताज'

ट्रम्प यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत त्यांची मुलगी इव्हांका आणि जावई जेरेड कुशनर हेही होते. इवांकाने हलक्या निळ्या रंगाचा मिडी घातला होता. त्यावर लाल रंगाची फुलं होती. डॉनल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ताजमहालच्या परिसरात व्यतित केलेली रोमँटिक संध्याकाळ भारतीयांच्या नव्हे तर जगाच्याच लक्षात राहणारी होती.

==============================================================================================

First published: February 24, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या