Trump India Visit LIVE Updates: काश्मीरबाबत ट्रम्प यांनी पुन्हा दाखवली मध्यस्थीची तयारी

भारत आणि अमेरिकेत तब्बल 3 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार होणार आहे. अमेरिकेसोबतचा हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे.

 • News18 Lokmat
 • | February 25, 2020, 18:24 IST |
  LAST UPDATED 3 YEARS AGO

  हाइलाइट्स

  18:18 (IST)

  मोदी आणि इम्रान दोघांशी माझे चांगले संबंध

  पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतावादाबद्दल मी आणि मोदींनी चर्चा केली. हा गंभीर प्रश्न आहे, यात  शंका नाही. पण पाकिस्तान यावर काम करत आहे. मी याबाबतीत काही मदत करायला तयार  आहे. कारण माझे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांशी (मोदी आणि इम्रान खान) चांगले संबंध आहेत.

  18:15 (IST)

  काश्मीरप्रश्नी पुन्हा दाखवली मध्यस्थीची तयारी

  पाकिस्तान काश्मीर प्रश्नावर काम करत आहे. अनेक वर्षं हा प्रश्न सुटलेला नाही. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. मी आणि मोदींनी दहशतवादासंदर्भात चर्चा केली. मी फारतर मदत म्हणून या बाबतीत मध्यस्थी करू शकतो, असं ट्रम्प म्हणाले.

   

  17:57 (IST)

  CAA ला ट्रम्प यांचं समर्थन

  CAA बद्दल प्रश्न विचारला तेव्हा ट्रम्प म्हणाले, "'धार्मिक स्वातंत्र्यबद्दल भारत योग्य काम करत आङे. मोदी सर्व धर्माचं स्वातंत्र्य इच्छितात."
  भारतातल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला CAA  ट्रम्प यांनी अशा प्रकारे समर्थनच दिलं.
  भारताने केलेल्या आदरातिथ्याबद्दल खूश होऊन ट्रम्प म्हणाले, भारतात माझ्यासारखं स्वागत कुणाचं झालं नसेल. 

  17:51 (IST)

  ट्रम्प म्हणाले....

  भारतात सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य आहे. पंतप्रधान मोदींबरोबर धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भात चर्चा झाली.

  दहशतवादाला लगाम घालण्यासाठी आम्ही पावलं उचलली आहेत.

  इबोला आणि कोरोना व्हायरस या जगापुढच्या मोठ्या समस्या आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

  17:49 (IST)

  CAA आणि दिल्ली हिंसाचाराबद्दल बोलले ट्रम्प

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी दिल्लीतल्या हिंसाचाराबद्दल भाष्य केलं. पण कोणत्याही भूमिकेतून चर्चा करण्यास नकार दिला. "मी हल्ल्यांबद्दल ऐकलं. पण मी त्याची चर्चा करणार नाही. हा भारताचा अंतर्गत विषय आहे. पंतप्रधान मोदींना भारतात धार्मिक स्वातंत्र्य अपेक्षित आहे. आम्ही त्यावर चर्चा केली.", असं ट्रम्प म्हणाले.

  14:0 (IST)

  'अपा'चे आणि 'MH60 रोमियो' ही दोन अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स अमेरिकेकडून भारताला मिळणार आहे.

  13:53 (IST)

  भारत आणि अमेरिकेदरम्यान 3 सामंज्यस्य  करार (MoU ) करण्यात आले.
  1.  मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सहकार्य आणि संशोधन
  2. वैद्यकीय उपकरणांची सुरक्षितता
  3. दोन्ही देशांमधल्या बड्या तेल कंपन्यांमध्ये सहकार्य


  13:50 (IST)

  भारत आणि अमेरिकेच्या या संरक्षण करारामुळे भारताच्या ताफ्यात अमेरिकेची शस्त्र येणार आहेत. M16 हे जगातलं सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टरचा त्यात समावेश आहे.


  13:40 (IST)

  भारतियांच्या स्वागतामुळे आम्ही भारावलो आहोत- ट्रम्प

  13:39 (IST)

  कट्टर इस्लामिक दहशतवादाशी आम्ही लढणार - ट्रम्प


  नवी दिल्ली 25 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीचा आज दुसरा दिवस आहे. मंगळवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी भारतात गाजत असलेल्या CAA, धार्मिक स्वातंत्र्य, पाकिस्तान या विषयावर त्यांनी भाष्य केलं. अहमदबादमध्ये दीड लाख लोकांसमोर दिलेलं भाषण आणि आग्र्याला ताजमहल पाहिल्यानंतर ट्रम्प रात्री राजधानी दिल्लीत दाखल झाले. राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत होणार आहे. त्यानंतर ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करतील. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांची चर्चा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अध्यक्ष ट्रम्प यांच्या दौऱ्यारीची प्रत्येक अपडेट News18Lokmat.comवर असणार आहे.