जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करुन देणारा 'मावळा द बोर्ड गेम' माहिती आहे का? Video

शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करुन देणारा 'मावळा द बोर्ड गेम' माहिती आहे का? Video

शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करुन देणारा 'मावळा द बोर्ड गेम' माहिती आहे का? Video

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पिढीपर्यंत पोहचावा यासाठी ‘मावळा द बोर्ड गेम’ हा खेळ मोठं काम करत आहे

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 4 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा विषय आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राची,त्यांच्या पराक्रमाची, स्वराज्य स्थापन करताना त्यांना आलेल्या अडचणींची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. ही माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी ‘मावळा द बोर्ड गेम’ हा खेळ मोठं काम करत आहे. मुंबईतील कुर्ल्यामध्ये  छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीनं या खेळाचं आयोजन केलं होतं. कशी सुचली कल्पना? छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी आपले तन-मन-धन अर्पण करणारे स्वराज्ययोद्धे किंवा मावळे हे आपल्या मातीतील सुपरहिरो आहेत.  आपल्या मुलांच्या खेळविश्वात ते का दिसत नाहीत? हा प्रश्न अनेक पालकांना पडत असेल. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी पुण्यातील अनिरुद्ध राजदेरेकर यांनी हा खेळ तयार केला. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीत महत्त्वाच्या ठरणार्‍या मैदानी आणि बैठ्या खेळांची जागा गेल्या काही वर्षांत नकळतपणे मोबाइल गेम्स, व्हिडिओ गेम्स, कार्टून चॅनल्स यांनी व्यापली आहे. आयर्न मॅन, थॉर, स्पायडरमॅन, हल्क, थानोस यांसारखे पाश्चात्त्य काल्पनिक सुपरहिरोज किंवा शिनचॅन, डोरेमॉन यासारखी कार्टून कॅरेक्टर्स त्यांच्या क्रीडा विश्वातील साथीदार बनले. मात्र हे आपले सुपरहिरो नाहीत. शिवकालीन शस्त्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मुंबईकरांना संधी, पाहा Video आपण आपल्या सुपरहिरोची ओळख त्यांना करून द्यायला कमी पडतो का? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सुपरहिरो - ज्याला संपूर्ण जगात शूर, आदर्श राजा म्हणून ओळखले जाते, त्यांचे तितकेच शूर आणि स्वराज्यासाठी आपले तन-मन-धन अर्पण करणारे स्वराज्ययोद्धे किंवा मावळे हे काही सुपरहिरोंपेक्षा कमी नाहीत. शौर्यभावना जागवणार्‍या या खास आपल्या मातीतील सुपरहिरोजची ओळख मुलांना केवळ इतिहासाच्या पुस्तकातून अतिशय सोप्या पद्धतीनं करून दिली जाते. कसा खेळला जातो खेळ? मावळा हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मोहिमेवर तयार केलेला खेळ आहे साधारणतः नवा व्यापार या खेळाची आठवण या खेळात होते.   खेळपट अर्थात बोर्ड त्यावर ट्रेमध्ये चार रंगातील मावळ्यांचे टोकन ( चार पायदळातील व चार घोडदळातील असे एकूण आठ ), 2 प्रकारचे फासे, 20 मावळा कार्ड्स, 10 दुर्ग कार्ड, शिवकालीन चलन होन ( 100, 500 आणि 1000 मूल्यांचे ) हे या खेळातील घटक आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    प्रत्येक खेळाडू स्वराज्य मोहिमेतील मावळा बनवून खेळत असतो.  शिवजन्मापासून सुरू होणार हा खेळ शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगानं पूर्ण होतो. या संपूर्ण प्रवासादरम्यानचा स्वराज्य मोहिमा आणि महत्त्वाचे प्रसंग बोर्डावरील घरांमध्ये दाखवण्यात आले आहेत. यामध्ये चांगल्या प्रसंगाबरोबरच वाईट प्रसंगाचाही समावेश आहे. प्रसंगानुरूप त्या घरावर येणाऱ्या खेळाडूचा फायदा किंवा नुकसान होते. स्वराज्यातील किल्ल्यांसाठी शिवाजी महाराजांनी लिहिलेलं दुर्मीळ पत्र! पाहा Photos खेळदरम्यान मिळणारी मावळा काढ आणि दुर्ग काढ ही खेळणाऱ्याला संपन्न बनवतात. शेवटच्या म्हणजेच शिवराज्याभिषेकाच्या घरात पोहोचल्यानंतर प्रत्येक मावळा आपली संपत्ती स्वराज्यासाठी अर्पण करतो. सर्वसाधारणपणे ही या खेळाची रूपरेषा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मोहिमेमध्ये आपण सहभागी आहोत ही कल्पनाच मुलांना भन्नाट वाटते त्यामुळेच या खेळातून मनोरंजनाबरोबरच स्वराज्याचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवण्याचा दुहेरी उद्देश आम्ही करत असतो असं अनिरुद्ध सांगतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात