कोल्हापूर पुरलेखागार कार्यालयात महाराणी ताराबाई यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर संस्थानच्या संदर्भातील अनेक कागदपत्रे आणि छायाचित्रे जतन करण्यात आलेली आहेत.
कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १९०२ साली इंग्लंडला भेट दिली होती. यावेळचा त्यांचा एक फोटो देखील जतन करण्यात आला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ 1894 साली पार पडला होता. त्यावेळचा फोटो देखील आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ प्रसंगीचे महाराजांचे पहिले गॅझेट यात उपलब्ध आहे.
राजर्षी छत्रपती शाहूराजांनी त्यावेळी किल्ले पन्हाळगडावर चहाचा मळा फुलवला होता. तर कोल्हापुरात बाहेरील व्यापाऱ्यांसाठी शाहूपुरी व्यापारी पेठेला सुरुवात केली होती. याचे दुर्मिळ फोटो देखील पाहता येतात.
26 जुलै 1902 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. मागासवर्ग प्रवर्गातील नागरिकांना शासकीय नोकरीत 50% आरक्षण या आदेशानुसार मिळाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील काही दस्तऐवज देखील इथे ठेवले आहेत. स्वराज्यातील प्रमुख गडकोटांच्या बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी 1,75,000 होनांची तरतुद केल्याबाबतचे इ.स. 1671-1672 सालचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र याठिकाणी आहे.
पुणे, इंदापूर, चाकण, सुपे, बारामती येथील हिंदू आणि मुसलमान लोकांचे वतन अफजलखानाच्या स्वारीच्या अगोदर ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे चालवण्याबाबत लिहिलेल्या दिनांक 18 डिंसेंबर 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्राचाही यामध्ये समावेश आहे.