जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : मुंबई इंडियन्स संघाला झटका, IPLआधीच ‘या’ खेळाडूची गोलंदाजी शैली ठरली आक्षेपार्ह!

IPL 2020 : मुंबई इंडियन्स संघाला झटका, IPLआधीच ‘या’ खेळाडूची गोलंदाजी शैली ठरली आक्षेपार्ह!

IPL 2020 : मुंबई इंडियन्स संघाला झटका, IPLआधीच ‘या’ खेळाडूची गोलंदाजी शैली ठरली आक्षेपार्ह!

इंडियन प्रीमिअर लीग ही स्पर्धा सुरू होण्याचीआधीच काही संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 डिसेंबर : इंडियन प्रीमिअर लीग ही स्पर्धा सुरू होण्याचीआधीच काही संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई इंडियन्सनं लिलावात विकत घेतलेल्या एका मराठमोळ्या खेळाडूच्या गोलंदाजीमुळे आयपीएलमध्ये मुंबईला फटका बसला आहे. रणजी क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या दिग्विजय देशमुख (Digvijay Deshmukh) या जलद गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह ठरली आहे. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स संघानं लिलावाच्या अखेरच्या फेरीत दिग्विजयला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतले होते आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा हिस्सा झाल्यानंतर रणजीमध्ये पदार्पण करण्याची संधी दिग्विजयला मिळाली. मात्र पहिल्याच सामन्यात त्याची गोलंदाजी शैली आक्षेपार्ह असल्याचे सांगण्यात आले. वाचा- सूर्यग्रहणाचा थेट क्रिकेट सामन्यावर परिणाम, BCCI करणार वेळापत्रकात बदल? 21 वर्षीय अष्टपैलू दिग्विजय देशमुखने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 7 सामन्यांत 9 गडी बाद केले. जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत त्याने पदार्पण केले. त्याने या सामन्यात एकूण सहा विकेट्स घेत आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 81 धावांची जबरदस्त खेळीही केली. अशा परिस्थितीत जेव्हा त्याची गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह असल्यामुळं त्याचा अहवाल संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक यांना पाठविण्यात आला आहे. वाचा- IPLच्या तारखेनं उडवली आठही संघांची झोप, दिग्गज खेळाडू घेणार माघार? क्रिकेटआधी सिनेमामध्ये केले होते काम दिग्विजयबाबतची एक गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल ती म्हणजे क्रिकेटमध्ये करिअर करण्यापूर्वी त्यांनी चित्रपटांमध्ये भूमिका केली होती. सुशांत सिंग राजपूतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘काय पो चे’ या सिनेमात दिग्विजय अली हाशमीच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात दिग्विजय एक प्रतिभावान तरूण क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. काय पो चे हा चित्रपट 2013मध्ये आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. सुशांत सिंग राजपूतसोबत, राजकुमार राव, अमित साध, मानव कौल असे सुप्रसिद्ध कलाकार ही होते. हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे. वाचा- KKRला मोठा दणका, कोट्यवधी खर्चून विकत घेतलेले खेळाडू खेळणार नाहीत IPL ऑलराऊंडर खेळाडू आहे दिग्विजय देशमुख 21 वर्षीय दिग्विजय उजव्या हाताचा फलंदाज आणि उजवा हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत 1 प्रथम श्रेणी आणि 7 टी -20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं एका सामन्यात 85 धावा आणि 6 विकेट घेतले आहेत. त्याचबरोबर, 7 टी -20 सामन्यात 19 धावा केल्या आहेत. तर, 9 विकेटही घेतल्या आहेत. दिग्विजय देशमुख देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळतो. त्याने डिसेंबरमध्येच रणजी सामन्यात फर्स्ट क्लासमध्ये प्रवेश केला आहे. देशमुख महाराष्ट्रात रणजी करंडक स्पर्धेत खेळला. त्याने 71 चेंडूत 83 धावा केल्या. त्यात सात चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता परंतु तो आठव्या क्रमांकावर पोहोचला. त्यामुळं जम्मू-काश्मीरच्या संघापासून आपल्या संघाला पराभूत होण्यापासून तो वाचवू शकला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2020
  • First Published :
जाहिरात
जाहिरात