नवी दिल्ली, 25 डिसेंबर : येत्या 26 डिसेंबरला सकाळी आठ ते अकरा या वेळेत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. यासाठी सर्व खगोलप्रेमी सज्ज झाले आहे. मात्र या सूर्यग्रहणाचा परिणाम क्रिकेटच्या सामन्यावरही होणार आहे, असे दिसत आहे. बीसीसीआयच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या वेळापत्रकात सूर्यग्रहणामुळं बदल करण्यात येणार आहे. याआधी 22 जुलै 2009 रोजी मध्य आणि उत्तर भारतातून खग्रास सूर्यग्रहण, तर 15 जानेवारी 2010 रोजी देशाच्या कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. यावर्षी आलेल्या या कंकणाकृती सूर्यग्रहणाबाबतची खास गोष्ट म्हणजे ग्रहणाच्या 12 तासआधी शुभ काळ सुरू होणार आहे. वाचा- Explainer : 10 वर्षांनी महाराष्ट्रात दिसणार ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’! कुठे आणि कधी पाहता येणार? वाचा मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं बीसीसीआयच्या महाव्यवस्थापक (ऑपरेशन्स) सबा करीम यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत, ‘मंगळवारी घडणार्या गोष्टींबद्दल आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. हा सामना आम्ही रेफरीवर सोडला आहे’, असे सांगितले. याआधी 1990मध्ये सूर्यग्रहणामुळे वेळापत्रकार बदल करण्यात आला होता. आज कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश यांच्यात सामना सुरू होणार होता. याआधी बैठकीत कर्णधार आणि सामन्याच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर चर्चा केली. सामन्यादरम्यान खेळाडूंवर ग्रहणामुळं होण्याऱ्या परिणामाबाबत नारायण नेत्रलयाचे अध्यक्ष व नेत्र तज्ज्ञ डॉ भुजंग शेट्टी म्हणाले, “सूर्यग्रहणाकडे लोक डोळ्यांनी पाहिले तर डोळयातील डोळयातील पडदा इजा होऊ शकते. जेव्हा ग्रहण शिगेला पोचते तेव्हा धोका वाढतो. वाचा- कर्जमाफीत न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार देणार मोठा दिलासा - भुजबळ कोणत्या भागात दिसणार सूर्यग्रहण? यावर्षी भारतात कर्नाटकतील काही भाग, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडच्या राज्यात अरुंद मार्गिकेत हे ग्रहण सूर्योदयानंतर पाहता येणार आहे. तर, उर्वरित देशभरात हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल. दक्षिण भारतात कन्ननूर, कोईम्बतूर, कोझीकोडे, मदुराई, मेंगलोर, उटी, तिरुमलापल्ली आदी भागात हे ग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसेल. भारताबरोबरच नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भुतान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. वाचा- मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणतात, माझ्याकडेही नाही जन्माचा दाखला पण… या वेळी दिसणार ग्रहण मुंबई: 8:04-10:55 (सकाळी) अहमदाबाद: 8:06-10:52 (सकाळी) नवी दिल्ली: 8.30-11.32 (सकाळी) बंगळुरू: 8:06-11:11 (सकाळी) हैदराबाद: 8:08-11:10 (सकाळी) चेन्नई: 8:08-11:19 (सकाळी) कोलकाता: 8:27-11:32 (सकाळी) गुवाहटी: 8:39-11:36 (सकाळी) शिलॉंग: 8:39-11:37 (सकाळी) कोशिमा: 8:45-11:44(सकाळी)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.