जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2020 : IPLच्या तारखेनं उडवली आठही संघांची झोप, दिग्गज खेळाडू घेणार माघार?

IPL 2020 : IPLच्या तारखेनं उडवली आठही संघांची झोप, दिग्गज खेळाडू घेणार माघार?

मार्च 2020मध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये असली तरी, हे हंगाम अनेक खेळाडूंचे करिअर तारू शकते.

मार्च 2020मध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये असली तरी, हे हंगाम अनेक खेळाडूंचे करिअर तारू शकते.

या तारखेला सुरू होऊ शकतो आयपीएलचा तेरावा हंगाम. मात्र परदेशी खेळाडू घेणार माघार

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 डिसेंबर : पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या हंगामाआधी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात सर्व संघांनी आवश्यकतेनुसार खेळाडूंची खरेदी केली जेणेकरून त्यांचा संघ बळकट होऊ शकेल. यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स लिलावात सर्वात महागडा ठरला. कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने 15.50 कोटी रुपयांना विकत घेतले. तर, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याच्या संघात 10.75कोटींचा घेतले. मात्र आता आयपीएलच्या सर्वच संघांची चिंता वाढली आहे ती आयपीएल स्पर्धेच्या तारखेवरून. मार्चमध्ये होणार आयपीएलचा तेरावा हंगाम वास्तविक, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि फ्रँचायझी यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या तारखेवरून वाद सुरू झाला आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या बातमीनुसार बीसीसीआयला इंडियन प्रीमियर लीगचा 13वा हंगाम 28 मार्च 2020पासून सुरू करायचा आहे. मात्र या तारखेमुळं सर्व संघांची झोप उडाली आहे. कारण याच कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी -20 मालिका आणि इंग्लंड व श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांचा समावेश आहे. त्यामुळं जर या कालावधीत स्पर्धा खेळवण्यात आली तर या चार देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये सामिल होणार नाहीत. वाचा- क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, रोहित शर्मा घेणार क्रिकेटमधून ब्रेक! कोलकाता संघाला सहन करावे लागणार मोठे नुकसान कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यात सर्वात जास्त नुकसान होईल. कारण कोलकाता नाईट रायडर्सने लिलाव करताना पॅट कमिन्सवर विक्रमी 15.50 कोटींची बोली लावली होती. त्यामुळं मार्चमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तर राष्ट्रीय संघांकडून खेळण्यात व्यस्त असल्याने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका मधील दिग्गजांना आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात खेळता येणार नाही. अशा स्थितीत फ्रँचायझींना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. वाचा- एका क्षणात सुपरमॅनसारखा हवेत उडाला फलंदाज आणि घेतला कॅच! पाहा VIDEO फ्रँचायझींना 1 एप्रिलपासून स्पर्धा सुरू करायची आहे आयपीएलच्या फ्रेंचायझीच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, “स्पर्धेचे वेळापत्रक अजून निश्चित नाही झाले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल जुन्या वेळापत्रकानुसार एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्राची सुरुवात करेल, अशी फ्रँचायझींना आशा आहे”. तर, फ्रँचायझी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी -20 मालिका 29 मार्च रोजी संपेल, तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी सामना 31 मार्चपर्यंत संपेल. अशा परिस्थितीत आपल्या मोठ्या खेळाडूंशिवाय स्पर्धा सुरू करणे चांगले नाही. हेच कारण आहे की जर आम्ही 1 एप्रिलपासून आयपीएलची सुरुवात केली तर ते खूप चांगले होईल”, असे सांगितले. वाचा- विराटनं जिंकली सर्वांची मनं, अस्सल मराठी ट्वीट करत दिली शार्दुल ठाकूरला शाबासकी!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात