नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर: सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Chennai Super Kings MS Dhoni) आपल्या जुन्या फिनिशिंग टचने हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध (IPL 2021 CSK vs SRH) झालेल्या सामन्यात संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आणि हैद्राबादवर 7 विकेट्सनी विजय मिळवत यंदाच्या पर्वात सर्वात प्रथम प्लेऑफमध्ये (CSK in Play-off IPL 2021) संघाला स्थान मिळवून दिले. इतकेच नव्हे तर धोनीने आणखी एक नवा विक्रम आपल्या नावावर (Century for MS Dhoni) केला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून ‘टायगर अभी जिंदा है’, ‘बंदे मे अभी दम है’ अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. हे वाचा- स्मृती मंधानाचं दमदार शतक, ऐतिहासिक कामगिरी करणारी पहिली भारतीय आयपीएलमध्ये 100 झेल घेण्याचा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर नोंदवला गेला आहे. चेन्नईकडून खेळताना महेंद्रसिंह धोनीने 100 कॅच घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या टि्वटर अकाउंटने धोनीचा कुल फोटो शेअर करत शतक साजरे केले आहे.
(C) Dhoni X 100!😍#SRHvCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/vsRr4xesr1
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 30, 2021
हैदराबादविरूद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत धोनीचा निर्णय सार्थ ठरवला. पहिल्यापासूनच चेन्नईच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. या सामन्यात वृद्धिमान साहा जेव्हा बाद झाला, तेव्हा कॅप्टन कूल धोनीच्या नावावर 100 झेल घेण्याचा विक्रम घेण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. हे वाचा- IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं शब्द पाळला! हैदराबादवरील विजयानंतर म्हणाला… यापूर्वी राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार म्हणून हा त्याचा 200 वा सामना खेळला होता. चेन्नई संघाचे 200 वेळा नेतृत्व करण्याचा मान त्याला मिळाला होता. चेन्नईने 2008 मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्या सामन्यात धोनीने सराव सत्राला हजेरी लावली नव्हती. संघातील खेळाडूंना तो थेट बसमध्ये भेटला होता. धोनीनं चेन्नईसाठी आतापर्यंत सर्व सामन्यात नेतृत्व केलं आहे. 2016-17 च्या हंगामात धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे 30 सामन्यात नेतृत्व केले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं तीन आयपीएल चषक आपल्या नावावर केले आहे. 2010, 2011 आणि 2018 साली धोनीच्या नेतृत्वात आयपीएल चषकावर आपलं नाव कोरले आहे.