• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं शब्द पाळला! हैदराबादवरील विजयानंतर म्हणाला...

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं शब्द पाळला! हैदराबादवरील विजयानंतर म्हणाला...

चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल स्पर्धेच्या 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश केला आहे. या आयपीएलमध्ये (IPL 2021) 'प्ले ऑफ' मधील प्रवेश निश्चित करणारी चेन्नई ही पहिली टीम ठरली आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 ऑक्टोबर :  चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल स्पर्धेच्या 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश केला आहे. या आयपीएलमध्ये (IPL 2021) 'प्ले ऑफ' मधील प्रवेश निश्चित करणारी चेन्नई ही पहिली टीम ठरली आहे. गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नईनं सनरायझर्स हैदराबादचा (CSK vs SRH) 6 विकेट्सनं पराभव केला. या विजयासह धोनीनं सीएसकेच्या फॅन्सना वर्षभरापूर्वी दिलेला शब्द पाळला आहे. धोनीनं मॅच संपल्यानंतर सांगितले की, 'या गोष्टीला (प्ले ऑफमध्ये प्रवेश) खूप महत्त्व आहे. कारण, आम्हाला कमबॅक करायचं आहे, असं मागच्या वर्षी मी सांगितले आहे. त्या गोष्टीपासून आम्ही सर्वांनी धडा घेतला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला याचं पूर्ण श्रेय आहे.' हैदराबादवरील विजयाचं श्रेय धोनीनं चेन्नईच्या बॉलर्सना दिलं. 'या विकेटवर बॉल जास्त वळत नव्हता. ते लक्षात घेऊन बॉलर्सनी स्पीड आणि लेंथ यांच्यात चांगला बदल केला. मी मॅचपूर्वी हेच सांगितलं होतं. त्यांनी आमच्या योजनेची पूर्ण अंमलबजावणी केली.' सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Willamson) यानं टीमच्या बॅटर्सनी जबाबदारी घ्यायला हवी होती, असं मत व्यक्त केलं. 'आम्ही पुरेसे रन केले नाहीत. त्यानंतरही आम्ही चांगली झुंज दिली. पॉवर प्ले मध्ये आम्ही 40 च्या आसपास रन केले होते. लोअर ऑर्डरच्या खेळाडूंच्या योगदानामुळे आम्ही चांगला स्कोअर करु शकलो.' असे विल्यमसन म्हणाला. CSK ठरली Play Off मध्ये पोहोचणारी पहिली टीम, Dhoni ने सिक्स मारून संपवली मॅच हैदराबादने दिलेलं 135 रनचं माफक आव्हान चेन्नईने 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. अंबाती रायुडू (Ambati Rayudu) 17 रनवर आणि एमएस धोनी 14 रनवर नाबाद राहिले. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) या ओपनिंग जोडीने चेन्नईला 75 रन करून दिले, ज्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. ऋतुराजने सर्वाधिक 45 रन केले, तर डुप्लेसिस 41 रन करून आऊट झाला. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. राशिद खानला एक विकेट मिळाली. 'द्रविड-धोनी जोडीचा टीम इंडियाला होईल मोठा फायदा,' माजी अध्यक्षांचा सल्ला आयपीएलच्या मागच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं नव्हतं. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईची टीम प्ले-ऑफ खेळली नव्हती. यावर्षी मात्र त्यांनी पुन्हा एकदा धमाका केला आहे. 11 पैकी 9 मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला, तर फक्त 2 सामने त्यांनी गमावले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: