मुंबई, 1 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Women vs Australia Women) यांच्यात सुरु असलेल्या डे-नाईट टेस्टमध्ये स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) शतक झळकावलं आहे. भारतीय महिला टीमची ही पहिलीच डे-नाईट टेस्ट आहे. या टेस्टमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय क्रिकेटपटू बनली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्टच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच स्मृतीनं शतक पूर्ण केलं आहे. स्मृतीची ही चौथीच टेस्ट आहे. या टेस्टमध्ये तिनं पहिलं शतक पूर्ण केलं आहे. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेल्या भारतीय टीमला स्मृतीनं दमदार सुरूवात करुन दिली.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या वन-डेमध्ये मध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या स्मृती मंधानानं या टेस्टमध्येही लय कायम राखली आहे. स्मृतीनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन बॉलर्सवर वर्चस्व गाजवलं.स्मृतीनं टेस्ट कारकिर्दीमधील तिसरं अर्धशतक 11 फोरच्या मदतीनं पूर्ण केलं. स्मृती आणि शफाली जोडीनं भारताला चांगली सुरुवात करुन दिली आहे. स्मृतीनं मॅचच्या आठव्या ओव्हरमध्ये डर्सी ब्राऊनला चार फोर लगावले.
Smriti Mandhana - first Indian women cricketer to score a Pink Ball Test ton. What a knock, what a class. pic.twitter.com/9K5Y4bXExB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 1, 2021
पहिल्या दिवशी नाबाद असलेल्या स्मृतीनं दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रातही आक्रमक खेळ करत शतक पूर्ण केलं. भारताकडून विराट कोहलीनं (Virat Kohli) पिंक बॉल टेस्टमध्ये पहिलं शतक झळकावलं होतं. त्यानं 2019 साली कोलकाता टेस्टमध्ये बांगलादेश विरुद्ध शतक झळकावलं होतं. विराटनंतर ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय तर पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
कुछ खास है हम सभीं मे... पिंक बॉल टेस्टमधील हा 'रिअल' फोटो जिंकेल तुमचं मन!
स्मृतीनं 2014 साली टेस्ट क्रिकेटमधील पदार्पणातच अर्धशतक झळकावलं होतं. इंग्लंड विरुद्ध तिनं ही कामगिरी केली होती. त्यानंतर सात वर्षांनी तिला यावर्षी टेस्ट खेळण्याची संधी मिळाली. ब्रिस्टलमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये स्मृतीनं 78 रनची खेळी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs Australia