नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांना त्यांच्या काळात कूल आणि स्टायलिश क्रिकेटपटू म्हणून ओळखलं जात होतं. सध्या 83 वर्षांचे असलेले गॅरी सोबर्स यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सोबर्स भारतीय लग्नात बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सोबर्स यांनी बॉलीवूडच्या 'जिया हो जिया कुछ बोल दो' या गाण्यावर डान्स केला आहे. विंडीजमधील बार्बाडोस इथं हा लग्नसोहळा झाला त्यावेळी त्यांनी डान्स केला.
बॉलीवूडमधील 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील गाण्यावर गॅरी सोबर्स यांनी डान्स केला. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी 'जिया हो जिया कुछ बोल दो' हे गाणं गायलं होतं. देव आनंद यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती.
Sir Gary Sobers dancing in an Indian wedding in Barbados. Over 80 plus in age his sense of rhythm is admirable. The great cricketer pic.twitter.com/EWWDcpWoSU
— Aviator Anil Chopra (@Chopsyturvey) February 21, 2020
गॅरी सोबर्स यांचा जन्म 1936 मध्ये झाला. त्यांनी विंडीजकडून 93 कसोटी आणि एकमेव एकदिवसीय सामना खेळला. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 8 हजार 32 धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक नाबाद 365 धावा त्यांनी काढल्या होत्या. कसोटी कारकिर्दीत त्यांनी 26 शतकं आणि 30 अर्धशतकं केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधल्या एका सामन्यात त्यांना एकही धाव काढता आली नाही.
प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना त्यांनी 383 सामने खेळताना 28 हजार 314 धावा केल्या आहेत. यातही त्यांनी सर्वाधिक नाबाद 365 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर प्रथम श्रेणीत 86 शतके आणि 121 अर्धशतके आहेत. याशिवाय कसोटीत गोलंदाजी करताना 235 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 1 विकेट घेतली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 1 हजार 43 विकेट आहेत. 1974 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
युजवेंद्र चहलचा शर्टलेस व्हिडीओ VIRAL, 'साकी-साकी' गाण्यावर केला डान्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket