WTC Final Live Streaming: 'इथे' पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांची ऐतिहासिक टेस्ट

WTC Final Live Streaming: 'इथे' पाहा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांची ऐतिहासिक टेस्ट

टीम इंडिया पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) खेळण्यासाठी आज (18 जून) न्यूझीलंड विरुद्ध उतरणार आहे.

  • Share this:

साऊथम्पटन, 18 जून : टीम इंडिया पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) खेळण्यासाठी आज (18 जून) न्यूझीलंड विरुद्ध उतरणार आहे. या महामुकबल्यात विराट कोहलीच्या (Virat kohli) आक्रमक कॅप्टनसीची लढत केन विल्यमसनच्या (Kane Williamson) कुल कॅप्टनसीशी होणार आहे. टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडं आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. या स्पर्धेच्या विजेत्या टीमला 16 लाख अमेरिकी डॉलर्सचं बक्षिस देण्यात येणार आहे.

विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. असं असूनही त्याने आजवर एकही आयसीसीची स्पर्धा कॅप्टन म्हणून जिंकलेली नाही. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धची फायनल जिंकून ही कमतरता दूर करण्याचा विराट या टेस्टमध्ये प्रयत्न करणार आहे.

कुठे होणार फायनल?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 18 ते 22 जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये होणार आहे.

किती वाजता सुरु होणार मॅच?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील फायनल सर्व दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. पहिल्या दिवशी दुपारी 3 वाजता या फायनल टेस्टचा टॉस होणार आहे.

कुठे पाहता येणार Live मॅच?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह मॅच स्टार स्पोर्ट्सवर दिसणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

WTC Final: टीम इंडिया कशी जिंकणार फायनल? विराटनं सांगितला ‘गेम प्लॅन’|

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.

न्यूझीलंडची टीम

केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लँडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे, कोलिन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

Published by: News18 Desk
First published: June 18, 2021, 9:58 AM IST

ताज्या बातम्या