साऊथम्पटन, 18 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2021) सुरु होण्यासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. फायनलच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीनं (Virat Kohli) अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. त्याचबरोबर फायनल जिंकण्याचा ‘गेम प्लॅन’ देखील सांगितला. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या फायनलपूर्वी टीम इंडियाला एकही प्रॅक्टीस मॅच खेळायला मिळाली नाही. याची कमतरता टीम इंडियानं इंट्रा स्क्वाड मॅच खेळून पूर्ण केली. तर न्यूझीलंडनं इंग्लंड विरुद्ध दोन टेस्टची मालिका खेळली आहे. ही मालिका जिंकल्यानं न्यूझीलंडचा फायनलपूर्वी आत्मविश्वास उंचावला आहे. विराटनं टीम इंडियाच्या गेम प्लॅनबद्दल सांगितले की, “आम्ही आक्रमक क्रिकेट खेळून मॅच जिंकणार. कोणत्याही टीममध्ये खराब खेळाडू नाहीत. आम्ही या सर्व गोष्टींचा विचार सध्या करत नाहीत. आमची विरोधी टीम (न्यूझीलंड) कशी आहे ते आम्हाला माहिती आहे. मैदानाच्या बाहेर आम्ही वेगळे आहोत. मैदानात आमच्यामधील जिद्द काही वेगळीच असते. न्यूझीलंडच्या टीममध्ये काही चांगले खेळाडू आहेत. ही खूप मोठी मॅच असून आम्ही पूर्ण क्षमतेनं खेळणार आहोत.” विराटनं यावेळी साऊथम्पटनच्या हवामानाबद्दलही मत व्यक्त केले. “साऊथम्पटनमधील हवामान लवकर बदलते. आम्ही सराव केला त्यावेळी उकाडा होता. आता थंडी आहे. आमच्यासाठी हवामानामुळे काही फरक पडलेला नाही. आम्ही मजबूत टीमसह खेळणार आहोत. आम्ही बेसिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. हवामानामुळे आम्ही टीम बदलणार नाही.” असे विराटने स्पष्ट केले. स्मृती मंधानाच्या 2 मोठ्या चुका, टीम इंडियाला किंंमत मोजावी लागणार टीम इंडियाची Playing 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







