WTC Final : साऊथम्पटनमध्ये रात्रभर पाऊस, वाचा आज कसं आहे हवामान?

संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेल्या या फायनलमध्ये (WTC Final 2021) पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे.

संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेल्या या फायनलमध्ये (WTC Final 2021) पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 18 जून :  भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला आजपासून सुरुवात होत आहे. या फायनलनंतर क्रिकेट विश्वाला पहिला टेस्ट वर्ल्ड चॅम्पियन विजेता मिळणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेल्या या फायनलमध्ये पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे. साऊथम्पटनमध्ये सुरु असलेल्या पावसानं खेळ वेळेवर सुरु होणार का याबाबत शंका आहे. इंग्लंडच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजता तर भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता ही टेस्ट मॅच सुरु होणार आहे. हवामान विभागानं दिलेली माहिती क्रिकेट फॅन्ससाठी निराशादायक आहे. साऊथम्पटनमध्ये 18 ते 22 जूनपर्यंत रोज पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या वेळेनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पहिले सेशन पावसाने वाया जाऊ शकते. रविंद्र जडेजानं देखील पावसाचा एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तो बाल्कनीत उभं राहून कॉफी पित आहे. साऊथम्पटनमध्ये येत्या 24 तासांमध्ये पावसाची शक्यता आहे. 18 जून रोजी कमाल तापमान 18 तर किमान तापमान 16 अंश असण्याची शक्यता आहे. हवेत दिवसभर गारवा असण्याची शक्यता आहे. साधारण हेच वातावरण पुढील पाच दिवस कायम असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. साऊथम्पटनमध्ये पाचही दिवस ऊन पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे टेस्ट मॅचच्या दरम्यान पाऊस पडला तर आऊट फिल्ड वाळवण्यात अडचणी येणार आहेय त्या परिस्थितीमध्ये पिच फास्ट बॉलर्सला मदत करेल. तसं झालं तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात. टीम इंडियानं एक दिवसांपूर्वीच प्लेईंग 11 घोषित केली आहे. यामध्ये तीन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनर्सचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा संकटमोचक बॅट्समन आजपासून खेळणार शेवटची टेस्ट 18-22 जूनदरम्यान ही फायनल रंगणार असली तरी 23 जूनला रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. जर फायनल ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीमना विजयी घोषित करण्यात येईल.
    Published by:News18 Desk
    First published: