• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final: न्यूझीलंडला पावसाचा फायदा, ‘या’ Playing 11 सह उतरणार मैदानात!

WTC Final: न्यूझीलंडला पावसाचा फायदा, ‘या’ Playing 11 सह उतरणार मैदानात!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा (WTC Final 2021) पहिला दिवस पावसाने रद्द झाला. या पावसाचा न्यूझीलंडला फायदा होणार आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 19 जून :  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा (WTC Final 2021) पहिला दिवस पावसाने रद्द झाला. पहिल्या दिवशी टॉस देखील होऊ शकला नाही. टीम इंडियानं गुरुवारीच Playing 11 ची घोषणा केली आहे. न्यूझीलंडच्या अंतिम 11 जणांची अद्याप प्रतीक्षा आहे. साऊथम्पटनमध्ये पाचही दिवस पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या पिचवर फास्ट बॉलर्सना मदत होणार आहे. भारतीय टीमनं अंतिम 11 मध्ये दोन स्पिनर्सचा समावेश केला आहे. तर दुसरिकडं न्यूझीलंडची टीम चार फास्ट बॉलर्ससह उतरण्याची शक्यता आहे. साऊथम्पटनच्या पिचववर हिरवळ आहे. त्याचबरोबर पावसामुळे स्पिन बॉलर्सना जास्त मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. या परिस्थितीमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर आणि काईल जेमीसन या चार फास्ट बॉलर्ससह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. विल्यमसन सांभाळणार धुरा केन विल्यमसन या मॅचमध्ये सातव्या नंबरला ऑल राऊंडर कोलिन डी ग्रँडहोमला संधी देऊ शकतो. ग्रँडहोम सीम बॉलिंगसह चांगला बॅट्समन आहे. तर स्पिन बॉलिंगची जबाबदारी स्वत: विल्यमसन सांभाळण्याची शक्यता आहे. इंग्लंडमंध्ये विल्यमसनचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याने इंग्लंडमध्ये 38 च्या स्ट्राईक रेटनं 9 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियालाही संधी टीम इंडियानं गुरुवारीच अंतिम 11 जणांची घोषणा केली आहे. पण, नियमानुसार टॉसच्या दरम्यान दोन्ही कॅप्टन एकमेकांना टीमची अंतिम यादी देत नाहीत तोपर्यंत टीममध्ये बदल होऊ शकतो. अर्थात टीममध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांनी स्पष्ट केले आहे. 45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा घडला 'हा' विक्रम, मिताली, स्मृतीला जमलं नाही ते शफालीनं केलं न्यूझीलंडची संभाव्य टीम केन विल्यमसन (कॅप्टन), डेवोन कॉन्वे, टॉम लाथम, रॉस टेलर, हेन्री निकोलस, कोलिन डी ग्रँडहोम, काइल जेमिसन, बीजे वॉटलिंग, नील वॅगनर,  ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी भारतीय टीम विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.
  Published by:News18 Desk
  First published: