45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला 'हा' रेकॉर्ड, मिताली आणि स्मृतीला जमलं नाही ते शफालीनं केलं

45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला 'हा' रेकॉर्ड, मिताली आणि स्मृतीला जमलं नाही ते शफालीनं केलं

ब्रिस्टलमध्ये सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India Women vs England Women) यांच्यातील टेस्टच्या तिसऱ्या दिवसावरही पावसाचं वर्चस्व होतं. पावसाचा अडथळा आलेल्या तिसऱ्या दिवशी शफाली वर्मानं (Shafali Verma) नवा विक्रम केला आहे.

  • Share this:

ब्रिस्टल, 19 जून :  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला. त्याचवेळी ब्रिस्टलमध्ये सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India Women vs England Women) यांच्यातील टेस्टच्या तिसऱ्या दिवसावरही पावसाचं वर्चस्व होतं. पावसाचा अडथळा आलेल्या तिसऱ्या दिवशी शफाली वर्मानं (Shafali Verma) नवा विक्रम केला आहे.

फॉलोऑन मिळाल्यानंतर पुन्हा बॅटिंगला आलेल्या भारतीय टीमने  तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी 1 आऊट 83 रन केले होते. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दुसऱ्या डावाच अपयशी ठरली. ती फक्त 8 रन काढून आऊट झाली.

शफालीचा नवा रेकॉर्ड

स्मृती आऊट झाल्यानंतर शफाली वर्मानं खेळाची सूत्र हाती घेतली. पहिल्या डावात 96 रन काढणाऱ्या शफालीनं दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. शफालीनं पदार्पणातील टेस्टमध्येच एक विक्रम केला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारी शफाली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. ही कामगिरी करणारी ती चौथी महिला क्रिकेटपटू आहे. भारतीय महिलांनी 1976 साली वेस्ट इंडिज विरुद्ध पहिली टेस्ट खेळली होती. तेव्हापासून आजवर कुणालाही न जमलेला रेकॉर्ड शफालीनं केला आहे.

टीम इंडिया अजूनही 82 रननं पिछाडीवर आहे. आता चौथ्या आणि शेवटच्या दिवशी पराभव टाळण्यासाठी शफाली आणि दीप्तीसह इतर सर्व बॅटरनं जबाबदारीनं खेळ करणे आवश्यक आहे. तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा शफाली 55 तर दीप्ती 18 रन काढून नाबाद होत्या.

टीम इंडियाला 'फॉलो ऑन'

ब्रिस्टल टेस्टमध्ये इंग्लंडनं पहिली इनिंग 9 आऊट 396 रनवर घोषित केली. या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 5 विकेट गमावून 187 रन केले. यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय टीमसमोर फॉलोऑन वाचवण्याचं मुख्य आव्हान होतं. पण, इंग्लंडच्या बॉलिंगसमोर पटापट भारताच्या विकेट गेल्या. इंग्लंडकडून सोफी एक्सेलस्टोनने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

पराभवानंतरही तब्बल 40 वर्ष कायम होता मिल्खा सिंग यांचा 'तो' रेकॉर्ड

चार दिवसांच्या सामन्यात फॉलोऑन देण्यासाठी 150 रनच्या आघाडीची  गरज असते, त्यामुळे भारताला तिसऱ्या दिवशी आपला स्कोअर 247 रनपर्यंत पोहोचवायचा होता. भारतीय टीम 231 रन काढून ऑल आऊट झाली. फॉलोऑन टाळण्यासाठी हरमनप्रीत कौरवर टीमच्या मोठ्या अपेक्षा होत्या. हरमनप्रीतला तिसऱ्या दिवशी एकही रन करता आली नाही. दीप्ती शर्मानं नाबात 29 रन काढले.

Published by: News18 Desk
First published: June 19, 2021, 9:13 AM IST

ताज्या बातम्या