मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : टीम इंडियाचा पराभव का झाला? सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण

WTC Final : टीम इंडियाचा पराभव का झाला? सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण

दोन वर्षांची मेहनत, सर्वात जास्त 12 टेस्टमध्ये विजय तरीही टीम इंडियाचा सर्वात मोठ्या मॅचमध्ये पराभव झाला. महान खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

दोन वर्षांची मेहनत, सर्वात जास्त 12 टेस्टमध्ये विजय तरीही टीम इंडियाचा सर्वात मोठ्या मॅचमध्ये पराभव झाला. महान खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

दोन वर्षांची मेहनत, सर्वात जास्त 12 टेस्टमध्ये विजय तरीही टीम इंडियाचा सर्वात मोठ्या मॅचमध्ये पराभव झाला. महान खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

मुंबई, 24 जून: दोन वर्षांची मेहनत, सर्वात जास्त 12 टेस्टमध्ये विजय तरीही टीम इंडियाचा सर्वात मोठ्या मॅचमध्ये पराभव झाला. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीखाली  टीम इंडियाला तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. यापूर्वी 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडनंच टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने पराभव केला होता. महान खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

सचिननं फायनलमधील पराभवानंतर एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला या स्पर्धेचं विजेतेपद जिंकल्याबद्दल न्यूझीलंडचं अभिनंदन केलं. त्यांनी फायनलमध्ये चांगला खेळ केल्याचं सचिननं म्हंटलं आहे. तसंच टीम इंडियाच्या पराभवाचं कारण देखील सचिननं सांगितलं.

" टीम इंडिया त्यांच्या कामगिरीमुळे निराश झाली असेल.मी सांगितले होते की, शेवटच्या दिवसाचे पहिल्या 10 ओव्हर्स या महत्त्वाच्या असतील. मॅचचं चित्र पहिल्या सत्रामध्ये स्पष्ट होईल. भारताने कोहली आणि पुजाराच्या विकेट्स पहिल्या सत्रात गमावल्या. त्यामुळे टीमवर दबाव वाढला" असं सचिननं स्पष्ट केलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन सपशेल अपयशी ठरले आहेत. अखेरच्या दिवशी टीम इंडियाची दुसरी इनिंग 170 रनवर संपुष्टात आली.  सहाव्या दिवशी सुरुवातीलाच काईल जेमिसनने भारताला विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या रुपात दोन धक्के दिले. यानंतर अजिंक्य रहाणेही लवकर माघारी परतला. ऋषभ पंतने 41 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बोल्टला 3 विकेट मिळाल्या. काईल जेमिसनने 2 आणि नील वॅगनरने 1 विकेट घेतली.

न्यूझीलंडला विजयासाठी 139 रनची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग केन विलियमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनी नाबाद राहून केला. केन विलियमसन याने अर्धशतकी खेळी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू झाले भावुक, विजेतेपदानंतर अश्रू अनावर

या टेस्टच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर पाचव्या दिवशीही पावसामुळेच सामना एक तास उशीरा सुरू झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही खराब प्रकाशामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, त्यामुळे सहाव्या दिवशी सामना खेळवला गेला.

First published:

Tags: Cricket news, Sachin tendulkar, Team india