साऊथमप्टन, 24 जून : न्यूझीलंड टीमनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पपियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाला पराभूत करत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडचं गेल्या 21 वर्षांमधील हे पहिलंच विजेतेपद आहे. यापूर्वी 2015 आणि 2019 साली त्यांना वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला होता. या दोन पराभवानंतर मिळालेला हा विजय संपूर्ण टीमसाठी खास क्षण आहे. या विजयानंतर न्यूझीलंडचे दोन अनुभवी खेळाडू चांगलेच भावुक झाले होते. या दोघांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मोठ्या संघर्षानंतर हा क्षण पाहिला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे विजेतेपद अनमोल आहे.
रॉस टेलर (Ross Taylor) आणि टीम साऊदी (Tim Southee) या दोन अनुभवी खेळाडूंसाठी हे विजेतेपद विशेष आहे. 37 वर्षांच्या टेलरनं फायनल मॅचमध्ये विजयी फटका मारला. 108 टेस्टचा अनुभव असलेल्या टेलरनं दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 47 रन काढले. तो टीमला विजय मिळवूनच परतला. मॅच संपल्यानंतर टेलर चांगलाच इमोशनल झाला होता. "हे विजेतेपद आयुष्यभर लक्षात राहील अशी भावना टेलरनं व्यक्त केली."
टेलरनं मॅच संपल्यानंतर सांगितले की, " मॅचच्या दरम्यान खूप पाऊस झाला. आमच्या टीमनं सुरुवातीला संघर्ष केला, पण त्यानंतर पुनरागमन करत विजेतेपद पटकावले. हे मी आयुष्यभर विसरु शकत नाही. आमच्यावर दबाव होता, हे नाकारता येणार नाही. पण आम्ही दबावामध्ये चांगली बॅटिंग केली."
WTC Final : ‘तो’ एक क्षण नडला, ऋषभ पंतचं धाडस टीम इंडियाच्या अंगलट
न्यूझीलंडकडून 79 टेस्ट खेळणाऱ्या टीम साऊदीचं देखील विजेतेपदात मोठे योगदान आहे. साऊदीने दुसऱ्या इनिंगमध्ये 48 रन देत 4 विकेट्स घेतल्या. साऊदीने यापूर्वी अनेकदा टीमला फायनलमध्ये हरताना पाहिलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी देखील हा खूप मोठा क्षण होता. मॅच संपवल्यानंतर साऊदी देखील खूप भावुक झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand