मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा रेकॉर्ड, 0 रनमध्ये गमावल्या 4 विकेट्स

इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा रेकॉर्ड, 0 रनमध्ये गमावल्या 4 विकेट्स

टीम इंडिया (Team India) मोठ्या अपेक्षेनं इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. इंग्लंडमधील आव्हानांची जय्यत तयारी करत असलेल्या टीम इंडियाच्या नावावर एक लज्जास्पद रेकॉर्ड आहे.

टीम इंडिया (Team India) मोठ्या अपेक्षेनं इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. इंग्लंडमधील आव्हानांची जय्यत तयारी करत असलेल्या टीम इंडियाच्या नावावर एक लज्जास्पद रेकॉर्ड आहे.

टीम इंडिया (Team India) मोठ्या अपेक्षेनं इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. इंग्लंडमधील आव्हानांची जय्यत तयारी करत असलेल्या टीम इंडियाच्या नावावर एक लज्जास्पद रेकॉर्ड आहे.

लंडन, 7 जून : टीम इंडिया (Team India) मोठ्या अपेक्षेनं इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. या दौऱ्याची सुरूवात टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनं (WTC Final 2021) करणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध 18 ते 22 जून दरम्यान ही फायनल होईल. त्यानंतर इंग्लंड विरुद्धची 5 टेस्ट मॅचची सीरिज टीम इंडिया खेळणार आहे. या सीरिजमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमचं पारडं जड आहे असा अंदाज अनेक दिग्गजांनी व्यक्त केला आहे.

इंग्लंडमधील आव्हानांची जय्यत तयारी करत असलेल्या टीम इंडियासाठी आजच्या दिवसाच्या (7 जून) आठवणी त्रासदायक आहेत. 69 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (7 जून 1952) टीम इंडियाने पहिल्या 4 विकेट्स 0 रनवर गमावल्या होत्या. टेस्ट क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात खराब सुरुवातीचा रेकॉर्ड आजही कायम आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्या मालिकेतील पहिली टेस्ट मॅच हेडिंग्लेमध्ये होती. विजय मांजरेकर यांच्या शतकामुळे टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 293 रनपर्यंत मजल मारली होती. विजय मांजरेकर (133) आणि कॅप्टन विजय हजारे (89) यांचा अपवाद वगळता एकही भारतीय बॅट्समन पहिल्या इनिंगमध्ये मोठा स्कोअर करु शकला नाही. इंग्लंडकडून जिम लेकरनं 4 तर फ्रॅड ट्रूमननं 3 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या इनिंगमध्ये निराशा

टीम इंडियाच्या 293 रनला उत्तर देताना इंग्लंडनं पहिल्या डावात 334 रन काढले. गुलाम अहमद यांनी पाच विकेट्स घेतल्यानं मोठी आघाडी घेण्याचा इंग्लंडचा उद्देश सफल झाला नाही. 41 रनच्या पिछाडीनंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात धक्कादायक झाली.

पंकज रॉय, दत्ता गायकवाड, विजय मंत्री आणि विजय मांजरेकर हे टॉपचे चार बॅट्समन शून्यावर परतले. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 0 अशी झाली होती. या लाजीरवाण्या सुरुवातीमुळे टीम इंडियाचा पराभव नक्की होता. कॅप्टन विजय हजारे यांनी दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. विजय हजारे (56) आणि दत्तू फडकर (64) यांनी अर्धशतक झळकावल्यानं टीम इंडियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 165 रनपर्यंत मजल मारली.

रॉजर फेडररनं 'या' कारणामुळे घेतली फ्रेंच ओपनमधून माघार

इंग्लंडकडून दुसऱ्या इनिंगमध्ये हॅरी ट्रूमन यांनी सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंडसमोर दुसऱ्या इनिंगमध्ये विजयासाठी 125 रनचे लक्ष्य होते. ते त्यांनी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत टीम इंडियाच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.

First published:

Tags: Cricket, India vs england, On this Day