जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's World Cup : 4,4,4,1,4,4 वेस्ट इंडिजची पॉवरफुल सुरूवात, भारताच्या अनुभवी बॉलरची धुलाई! VIDEO

Women's World Cup : 4,4,4,1,4,4 वेस्ट इंडिजची पॉवरफुल सुरूवात, भारताच्या अनुभवी बॉलरची धुलाई! VIDEO

Women's World Cup : 4,4,4,1,4,4 वेस्ट इंडिजची पॉवरफुल सुरूवात, भारताच्या अनुभवी बॉलरची धुलाई! VIDEO

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India Women vs West Indies Women) यांच्यात महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये 318 रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं आक्रमक सुरूवात केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India Women vs West Indies Women) यांच्यात महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील मॅच सुरू आहे. भारतीय टीमनं पहिल्यांदा बॅटींग करत 8 आऊट 317 रन केले. भारतीय महिला टीमचा वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सर्वोच्च स्कोअर आहे. 318 रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं आक्रमक सुरूवात केली. वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटीन (Deandra Dottin) आणि हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) या जोडीनं दमदार सुरूवात केली. भारताची सर्वात अनुभवी बॉलर झुलन गोस्वामीलाच (Jhulan Goswami) या जोडीनं टार्गेट केलं. झुलनच्या एकाच ओव्हरमध्ये त्यांनी 5 फोरसह 21 रन काढले. वेस्ट इंडिजच्या इनिंगमधील 5 वी ओव्हर भारतीय टीमसाठी चांगलीच महागडी ठरली. मॅथ्यूजनं झुलनच्या या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलर फोर लगावले. त्यानंतर चौथ्या बॉलरवर 1 रन काढला. त्यानंतर डॉटीननं शेवटच्या दोन बॉलवर पुन्हा फोर लगावले. वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या रेकॉर्डपासून फक्त एक विकेट दूर आहे. महिला क्रिकेट विश्वातील सर्वात अनुभवी बॉलर म्हणून ती ओळखली जाते. पण डॉटीन आणि मॅथ्यूज जोडीवर याचा काहीही फरक पडला नाही.

जाहिरात

वेस्ट इंडिजची आक्रमक खेळाडू असलेल्या डॉटीननं फक्त 35 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्ससह अर्धशतक झळकावले. डॉटीनला अखेर स्नेह राणानं 62 रनवर आऊट केले. तिने 46 बॉलमध्ये 10 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं हे रन केले. त्यानंतर मेघना सिंहनं नाईटला 5 रनवर आऊट करत टीम इंडियाला दुसरं यश मिळवून दिलं. Women’s World Cup : स्मृती-हरमनचा प्रतिहल्ला, टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये रेकॉर्ड यापूर्वी टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरूद्धच्या मॅचमध्ये (India women vs West Indies Women) पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 8 आऊट 317 रन केले.  हरमन आणि स्मृती या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 184 रनची मोठी भागिदारी केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय टीमसाठी ही सर्वोच्च भागिदारी आहे. स्मृतीनं 119 बॉलमध्ये 13 फोर आणि 2 सिक्ससह 123 रन केले. हरमननं स्मृतीच्या बरोबरीनं खेळ करत वन-डे करिअरमधील चौथे शतक झळकावले. वर्ल्ड कप स्पर्धेतील तिचे हे तिसरे शतक आहे. हरमननं 107 बॉलमध्ये 109 रनची आक्रमक खेळी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात