मुंबई, 12 मार्च : स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या दोघींच्या आक्रमक शतकामुळे टीम इंडियानं (Team India Women) वर्ल्ड कप स्पर्धेत नवा रेकॉर्ड केला आहे. न्यूझीलंडमध्ये महिला वर्ल्ड कप स्पर्धा (Women’s World Cup 2022) सुरू आहे. टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरूद्धच्या मॅचमध्ये (India women vs West Indies Women) पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 8 आऊट 317 रन केले. भारतीय महिला टीमचा वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सर्वोच्च स्कोअर आहे. भारतीय टीमनं वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच 300 पेक्षा जास्त रन केले. यापूर्वी भारतानं वेस्ट इंडिज विरूद्धच 2013 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 6 आऊट 284 रन केले होते. मिताली राजच्या (Mithali Raj) टीमनं 9 वर्षांनी हा रेकॉर्ड मोडला आहे. स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या अनुभवी जोडीनं केलेल्या प्रतिहल्ल्यामुळेच टीम इंडियाला नवा रेकॉर्ड करता आला. वेस्ट इंडिज विरूद्धच्या लढतीमध्ये स्मृती आणि यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) या जोडीनं 49 रनची आक्रमक भागिदारी केली. यास्तिका 31 रन काढून आऊट झाली. त्यानंतर कॅप्टन मिताली राज (5) आणि दीप्ती शर्मा (15) रन काढून आऊट झाल्यानं टीम इंडियाचा स्कोअर 3 आऊट 78 झाली होती. त्यानंतर स्मृती आणि व्हाईस कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांची जोडी जमली.
India finish their 50 overs at 317/8, helped by two exquisite centuries by Smriti Mandhana and Harmanpreet Kaur 🙌
— ICC (@ICC) March 12, 2022
Can West Indies chase this mammoth total?#CWC22 pic.twitter.com/A0ao1wvpbS
हरमन आणि स्मृती या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 184 रनची मोठी भागिदारी केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय टीमसाठी ही सर्वोच्च भागिदारी आहे. स्मृतीनं 119 बॉलमध्ये 13 फोर आणि 2 सिक्ससह 123 रन केले. हरमननं स्मृतीच्या बरोबरीनं खेळ करत वन-डे करिअरमधील चौथे शतक झळकावले. वर्ल्ड कप स्पर्धेतील तिचे हे तिसरे शतक आहे. हरमननं 107 बॉलमध्ये 109 रनची आक्रमक खेळी केली. या दोघींच्या शतकामुळेच टीम इंडियानं दमदार स्कोअर उभारला. Women’s World Cup : स्मृतीनंतर हरमनचही शतक, टीम इंडियाचं दमदार कमबॅक! भारतीय टीमनं या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा 107 रनने पराभव करत जोरदार सुरूवात केली होती. त्यानंतर न्यूझीलंड विरूद्ध टीम इंडियाचा 62 रननं पराभव झाला. आता वेस्ट इंडिजला पराभूत करत पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतण्याचा टीमचा प्रयत्न असेल.