Home /News /sport /

Women's World Cup : टीम इंडियाचा रेकॉर्ड कायम, वेस्ट इंडिज विरूद्ध मिळवला मोठा विजय

Women's World Cup : टीम इंडियाचा रेकॉर्ड कायम, वेस्ट इंडिज विरूद्ध मिळवला मोठा विजय

भारतीय महिला क्रिकेट टीमनं (Team India Women) वर्ल्ड कप स्पर्धेत (Women's World Cup 2022) जोरदार कमबॅक केलं आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (India Women vs West Indies Women) 155 रननं दणदणीत पराभव केला.

    मुंबई, 12 मार्च :  भारतीय महिला क्रिकेट टीमनं (Team India Women) वर्ल्ड कप स्पर्धेत (Women's World Cup 2022) जोरदार कमबॅक केलं आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (India Women vs West Indies Women) 155 रननं दणदणीत पराभव केला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील महिला वर्ल्ड कपमधील ही सातवी मॅच आहे. या सातही मॅचमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे. या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या दोन मॅच जिंकत वेस्ट इंडिजची टीम फॉर्मात होती. तर न्यूझीलंडनं टीम इंडियाचा मोठा पराभव केला होता. पण, मिताली राजच्या (Mithali Raj) टीमनं दोन दिवसांमध्येच जोरदार कमबॅक केले. भारताने दिलेलं 318 रनचं आव्हान वेस्ट इंडिजला पेलवलं नाही. दमदार सुरूवातीनंतरही त्यांची टीम 40.3 ओव्हर्समध्ये 162  रनवर ऑल आऊट झाली. वेस्ट इंडिजकडून डिएंड्रा डॉटीन (Deandra Dottin) आणि हेली मॅथ्यूज (Hayley Matthews) या जोडीनं दमदार सुरूवात केली. भारताची सर्वात अनुभवी बॉलर झुलन गोस्वामीलाच (Jhulan Goswami) या जोडीनं टार्गेट केलं. झुलनच्या एकाच ओव्हरमध्ये त्यांनी 5 फोरसह 21 रन काढले. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 100 रनची भागिदारी केली. स्नेह राणानं डॉट्रीनला आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या अन्य विकेट्स ठराविक अंतरानं पडल्या. भारताकडून स्नेह राणानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मेघना सिंहला  2 विकेट्स मिळाल्या. भारतीय टीमची पुढील मॅच इंग्लंड विरूद्ध आहे. वेस्ट इंडिज विरूद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयानं टीम इंडियाच्या आत्मविश्वात भर पडणार आहे. यापूर्वी टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरूद्धच्या मॅचमध्ये (India women vs West Indies Women) पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 8 आऊट 317 रन केले.  हरमन आणि स्मृती या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 184 रनची मोठी भागिदारी केली. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय टीमसाठी ही सर्वोच्च भागिदारी आहे. Women's World Cup : स्मृती-हरमनचा प्रतिहल्ला, टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये रेकॉर्ड स्मृतीनं 119 बॉलमध्ये 13 फोर आणि 2 सिक्ससह 123 रन केले. हरमननं स्मृतीच्या बरोबरीनं खेळ करत वन-डे करिअरमधील चौथे शतक झळकावले. वर्ल्ड कप स्पर्धेतील तिचे हे तिसरे शतक आहे. हरमननं 107 बॉलमध्ये 109 रनची आक्रमक खेळी केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Team india, West indies

    पुढील बातम्या