मुंबई, 11 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (ICC Women's World Cup 2022) शनिवारी भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात लढत होणार आहे. भारतीय टीमनं पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेची दमदार सुरूवात केली होती. त्यानंतर गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये यजमान न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पराभव केला. आता वेस्ट इंडिजला पराभूत करून पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याचा टीमचा प्रयत्न असेल. मिताली राजच्या (Mithali Raj) टीमसाठी वेस्ट इंडिजचं आव्हान पार करणे सोपे नाही.
वेस्ट इंडिजनं या स्पर्धेतील दोन्ही सामने निसटत्या फरकानं जिंकले आहेत. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये यजमान न्यूझीलंडला 3 रननं तर दुसऱ्या मॅचमध्ये गतविजेत्या इंग्लंडला 7 रननं पराभूत केले. न्यूझीलंडच्या विरूद्ध टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली होती. शफाली वर्माच्या जागेवर खेळलेल्या यास्तिका भाटीयानं 59 बॉलमध्ये 28 रन काढले. स्मृती मंधाना 6 तर दीप्ती शर्मा 5 रन काढून आऊट झाली. कॅप्टन मिताली राजनं 31 रन केले.
IND vs SL : श्रीलंकेचा प्रमुख खेळाडू जखमी, दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम अडचणीत
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील मॅच कधी खेळला जाणार आहे?
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्या महिला टीममधील मॅच शनिवार (12 मार्च) रोजी खेळला जाणार आहे.
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कुठे खेळला जाणार आहे?
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मॅच हेमिल्टनच्या सडन पार्कमध्ये खेळला जाणार आहे.
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मॅच किती वाजता सुरू होणार आहे?
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मॅच शनिवारी सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. या मॅचचा टॉस सकाळी 6.00 वाजता होईल.
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज मॅच लाईव्ह कुठे पाहता येईल?
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील लाईव्ह मॅच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येईल.
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहाता येईल?
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग हे डिस्ने-हॉटस्टारवर पाहाता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.