मुंबई, 12 मार्च : टीम इंडियाची प्रमुख बॅटर स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलं शतक झळकावलं आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup) भारताची लढत वेस्ट इंडिज विरूद्ध (India Women vs West Indies Women) सुरू आहे. या मॅचमध्ये स्मृतीनं शतक झळकावलं आहे. स्मृतीनं हे शतक 108 बॉलमध्ये पूर्ण केलं. या खेळीत तिने 9 फोर आणि 2 सिक्स लगावले. वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज विरूद्धचं स्मृतीचं हे दुसरं शतक आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये 2017 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्येही स्मृतीनं शतक झळकावले होते. स्मृतीनं पाकिस्तान विरूद्ध अर्धशतक झळकावत स्पर्धेची सुरूवात जोरदार केली होती. त्यानंतर न्यूझीलंड विरूद्ध ती झटपट आऊट झाली. न्यूझीलंड विरूद्धच्या पराभवानंतर भारतीय टीम जिद्दीनं या मॅचमध्ये उतरली आहे. या टीमचं स्मृतीनं आघाडीवर राहात नेतृत्त्व केलं. स्मृती आणि यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) या जोडीनं 49 रनची आक्रमक भागिदारी केली. यास्तिका 31 रन काढून आऊट झाली. त्यानंतर कॅप्टन मिताली राज (5) आणि दीप्ती शर्मा (15) रन काढून आऊट झाल्यानं टीम इंडियाचा स्कोअर 3 आऊट 78 झाली होती. त्यानंतर स्मृती आणि व्हाईस कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांची जोडी जमली.
💯 for @mandhana_smriti - her 5⃣th WODI ton! 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2022
What an outstanding knock this has been by the #TeamIndia opener! 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/ZOIa3KL56d#CWC22 | #WIvIND pic.twitter.com/LntyZ7QLNV
हरमननं न्यूझीलंड विरूद्धच्या मॅचमध्ये एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले होते. तिने वेस्ट इंडिज विरूद्धही तो फॉर्म कायम ठेवला आहे. स्मृती आणि हरमन जोडीनं वेस्ट इंडिजच्या बॉलर्सना वरचढ होऊ दिलं नाही. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली आहे. यावेळी हरमननं अर्धशतक पूर्ण केलं. या वर्ल्ड कपमधील तिचं सलग दुसरं अर्धशतक आहे. IND vs SL : पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियात एक बदल नक्की, मॅचपूर्वीच बुमराहची घोषणा भारतीय महिला टीमनं (Team India Women) वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात वेस्ट इंडिज विरूद्ध एकही मॅच गमावलेली नाही. यापूर्वीच्या सर्व 6 मॅच टीम इंडियानं जिंकल्या आहेत. हाच इतिहास कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.