जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियात एक बदल नक्की, मॅचपूर्वीच बुमराहची घोषणा

IND vs SL : पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियात एक बदल नक्की, मॅचपूर्वीच बुमराहची घोषणा

IND vs SL : पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियात एक बदल नक्की, मॅचपूर्वीच बुमराहची घोषणा

भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट आज (शनिवार) बेंगलुरूमध्ये होत आहे. ही डे-नाईट टेस्ट असून गुलाबी बॉलमध्ये (Pink Ball) खेळवली जाणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बेंगलुरू, 12 मार्च : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट आज (शनिवार) बेंगलुरूमध्ये होत आहे. ही डे-नाईट टेस्ट असून गुलाबी बॉलमध्ये (Pink Ball) खेळवली जाणार आहे. मोहाली टेस्टमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर भारतीय टीमचं पारडं जड आहे. आता ही मॅच जिंकून सीरिजचा यशस्वी समारोप करण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल. बेंगलुरू टेस्टमध्ये टीम इंडियात एक बदल निश्चित आहे. टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेल (Axar Patel) फिट झाला असून तो प्लेईंग 11 मध्ये नक्की असेल, अशी घोषणा टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah)  पिंक बॉल टेस्टच्या आदल्या दिवशी केली आहे. अक्षर पटेल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकला नाही. तसंच त्यानंतर कोरोनाची लागण झाल्यानं तो काही काळ टीमपासून दूर होता. आता अक्षर फिट असून त्याचा कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) जागी समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल हा टीमसाठी उपयुक्त खेळाडू आहे. तो बॅट, बॉल आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये टीमसाठी योगदान देतो. त्यामुळे तो प्लेईंग 11 मध्ये खेळणार असल्याचं बुमराहनं स्पष्ट केलंय. अक्षर पटेलचा जयंत यादवच्या जागी प्लेईंग 11 मध्ये समावेश होईल, असं मानलं जातंय. Women’s World Cup : मिताली राजचा नवा रेकॉर्ड, वेस्ट इंडिजविरूद्ध रचला इतिहास अक्षर पटेल गेल्या वर्षभरात भारतीय पिचवरील सर्वात मोठा मॅच विनर बॉलर ठरला आहे. त्यानं 5 टेस्टमध्ये 36 विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरनं एका इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी 5 वेळा तर एका टेस्टमध्ये 10 विकेट्स घेण्याची कामगिरी 1 वेळा केली आहे. इंग्लंड विरूद्ध मागच्या वर्षी अहमदाबादमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये अक्षरनं 11 विकेट्स घेतल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात