Home /News /sport /

IND vs NZ : टीम इंडियातील पदार्पणानंतर पहिल्यांदाच दिग्गज खेळाडू बाहेर, खराब फॉर्मचा फटका

IND vs NZ : टीम इंडियातील पदार्पणानंतर पहिल्यांदाच दिग्गज खेळाडू बाहेर, खराब फॉर्मचा फटका

महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील (Women's World Cup 2022) विजयीा अभियान कायम ठेवण्याच्या निर्धारानं टीम इंडिया (Team India Women) मैदानात उतरली आहे. स्पर्धेतील दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियानं मोठा बदल केला आहे.

    मुंबई, 10 मार्च : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील (Women's World Cup 2022) विजयीा अभियान कायम ठेवण्याच्या निर्धारानं टीम इंडिया (Team India Women) मैदानात उतरली आहे. भारतीय क्रिकेट टीमनं पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा मोठा पराभव केला होता. त्यानंतर आता टीम समोर यजमान न्यूझीलंडचं खडतर आव्हान आहे. न्यूझीलंडनं नुकत्याच झालेल्या वन-डे सीरीजमध्ये टीम इंडियाचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाला आहे. टीम इंडियानं या मॅचमध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे. सध्या फॉर्मात नसलेली आक्रमक खेळाडू शफाली वर्माला (Shafali Verma) या मॅचमधून वगळण्यात आलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्यांदाच शफालीनं टीममधील जागा गमावली आहे. या वर्षातील खराब फॉर्म हे याचं मुख्य कारण आहे. न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या सीरिजमध्ये शफालीला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर पाकिस्तान विरूद्धच्या  पहिल्या मॅचमध्ये ती शून्यावर आऊट झाली होती. त्यामुळे शफालीला टीममधून वगळण्यात आले असून तिच्या जागी यास्तिका भाटियाचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. शफालीनं 2002 मधील 6 वन-डेमध्ये फक्त 16च्या सरासरीनं 86 रन केले आहेत. यामध्ये केवळ एका अर्धशतकांचा समावेश आहे. मागील 3 पैकी दोन मॅचमध्ये ती शून्यावर आऊट झाली आहे. या खराब कामगिरीचा फटका तिला बसला. जून 2021 मध्ये शफालीनं वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ती टीमच्या बाहेर आहे. Mankading च्या नियमातील बदलावर इंग्लंडचा खेळाडू नाराज, म्हणाला... शफालीच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलेल्या यास्तिकानं आजवर 7 वन-डेमध्ये 193 रन केले असून 64 हा तिचा सर्वोच्च स्कोअर आहे. यास्तिकानं वन-डे क्रिकेटमध्ये 27 च्या सरासरीनं रन केले आहेत. तर शफाली वर्मानं 12 मॅचमध्ये 260 रन केले असून तिची सरासरी 21 आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Indian women's team, New zealand, Team india, World cup india

    पुढील बातम्या