जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ : टीम इंडियाला दमदार फिल्डिंगमुळे मिळालं पहिलं यश, न्यूझीलंडची खराब सुरूवात VIDEO

IND vs NZ : टीम इंडियाला दमदार फिल्डिंगमुळे मिळालं पहिलं यश, न्यूझीलंडची खराब सुरूवात VIDEO

IND vs NZ : टीम इंडियाला दमदार फिल्डिंगमुळे मिळालं पहिलं यश, न्यूझीलंडची खराब सुरूवात VIDEO

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s ODI World Cup 2022) टीम इंडियाची दुसरी मॅच हॅमिल्टनमध्ये सुरू झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s ODI World Cup 2022) टीम इंडियाची दुसरी मॅच हॅमिल्टनमध्ये सुरू झाली आहे.  भारतीय टीमनं पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा 107 रननं पराभव केला. त्यानंतर आता दुसरी लढत यजमान न्यूझीलंडशी (India Women vs New Zealand Women) सुरू आहे. पाकिस्तान विरूद्धच्या लढतीत ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरलेल्या पूजा वस्त्राकारनं (Pooja Vastrakar) टीम इंडियाला दोन यश मिळवून दिले आहेत. या मॅचमध्ये टीम इंडियाची कॅप्टन मिताली राजनं (Mithali Raj) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. सूजी बेट्स आणि सोफिया डिव्हाईन यांनी न्यूझीलंडच्या इनिंगला सुरूवात केली. या दोघींनी सुरूवातीच्या 2 ओव्हरमध्ये 9 रन केले होते. भारतासाठी डोकेदुखी ठरू शकणारी ही जोडी पूजा वस्त्रकारनं दमदार फिल्डिंग करत फोडली. न्यूझीलंडच्या इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरमध्ये एक रन झटपट घेण्याचा सूजी बेट्सचा प्रयत्न फसला. पॉईंट्सला उभ्या असलेल्या पूजानं डायरेक्ट थ्रो करत सूजीला रन आऊट केले.

जाहिरात

सूजी आऊट झाल्यानंतर पूजानंच सोफी डिव्हाईनची महत्त्वाची विकेट टीम इंडियाला मिळवून दिली. मोठी खेळी करण्याच्या दिशेनं वाटचाल करत असलेली सोफी 35 रन काढून आऊट झाली. सोफीनं या स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंड विरूद्ध शतक झळकावले होते. सध्या फॉर्मात असलेल्या सोफीला पूजानं आऊट करत टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. IND vs PAK : सिलेंडर वूमनचा पाकिस्तानला तडाखा, धोनीसारखी आहे Untold Story न्यूझीलंडची या वर्ल्ड कपमधील तिसरी मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये त्यांचाै वेस्ट इंडिजनं निसटता पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी बांगलादेशचा मोठा पराभव केला. भारतीय टीम पाकिस्तान विरूद्धच्या विजयानंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत उतरली आहे. टीम इंडियानं या मॅचमध्ये एक बदल केला. सध्या फॉर्मात नसलेल्या शफाली वर्माच्या जागी यास्तिका भाटियाचा टीमममध्ये समावेश करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात